वैनतेय विद्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा स्मृती शताब्दी वर्ष परिपूर्ती दिन साजरा
![]()



वैनतेय विद्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा स्मृती शताब्दी वर्ष परिपूर्ती दिन साजरा
निफाड निफाड येथील वैनतेय विद्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्ष परिपूर्ती दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
याप्रसंगी व्यासपीठावर न्या रानडे विद्या प्रसारक मंडळाचे कार्यकारी विश्वस्त वि .दा व्यवहारे, विद्यालयाचे प्राचार्य एम एस माळी , उपप्राचार्य बी. के ठोके, पर्यवेक्षक एन. डी शिरसाट, पर्यवेक्षक तुकाराम तलवारे आदी मान्यवर होते
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रशीद पठाण यांनी केले राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन वि.दा.व्यवहारे यांच्या हस्ते करण्यात आले
श्रीमती गायत्री पंड्या यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवन कार्यावर माहिती सांगितली याप्रसंगी कार्यकारी विश्वस्त वि . दा. व्यवहारे सर यांचे भाषण झाले आभार प्रदर्शन उपप्राचार्य बी के ठोके यांनी केले तर सूत्रसंचालन रशीद पठाण यांनी केले.
फोटो- राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्ष परिपूर्ती दिन कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित कार्यकारी विश्वस्त वि . दा व्यवहारे, प्राचार्य एम एस माळी , उपप्राचार्य बी. के ठोके, पर्यवेक्षक एन. डी शिरसाट, पर्यवेक्षक तुकाराम तलवारे , सुभाष खाटेकर , रशीद पठाण आदी

