1 min read

डॉ. शिवचरण उज्जैनकर राज्यस्तरीय संजीवनी पुरस्काराने सन्मानित

Loading

डॉ. शिवचरण उज्जैनकर राज्यस्तरीय संजीवनी पुरस्काराने सन्मानित

संजीवनी बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ केळवद जिल्हा बुलढाणा तर्फे सर्व जातीय भव्य सामूहिक विवाह सोहळा आणि राज्यस्तरीय संजीवनी पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन दिनांक 5 मे 2023 रोजी केळवद जिल्हा बुलढाणा या ठिकाणी हा सोहळा संपन्न झाला याप्रसंगी या सर्व जातीय सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये 51 वधू-वरांचा शुभविवाह संपन्न झाला याप्रसंगी शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांना राज्यस्तरीय संजीवनी पुरस्काराने मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले या प्रसंगी व्यासपीठावर सुरेश आप्पा खबुतरे जि.प.च्या माजी सदस्य सौ. ज्योतीताई खेडेकर मराठी अभिनेत्री रेणुका शहाणे सर्पमित्र सौ. वनिता बोराडे त्याचप्रमाणे शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे राज्य प्रसिद्धीप्रमुख ह. भ. प. शंकर महाराज राजपूत जिल्हा ग्राम गिता प्रचारक ह. भ. प. दिपक सावळे महाराज, फाउंडेशनचे बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुख प्राचार्य डॉ. पंढरीनाथ शेळके बुलढाणा जिल्हा अध्यक्ष शाहीर मनोहरराव पवार जिल्हा समन्वयक शितल शेगोकार जिल्हा कोषाध्यक्ष प्राचार्य दिनकर झनक श्री प्रदीप मोरे , श्री मनोहर काळे, डॉ. तृप्ती काटेकर ,अंध श्रद्धा निर्मूलनाच्या प्रतिभा भुतेकर याप्रसंगी केळवद गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजक तथा संजीवनी बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा उज्जैनकर फाउंडेशनचे बुलढाणा जिल्हा संघटक डॉ. निवृत्तीभाऊ जाधव यांनी प्रास्ताविक केले तर या कार्यक्रमाचे सुरेल सूत्रसंचालन प्राचार्य डॉ.पंढरीनाथ शेळके यांनी केले. प्रसंगी अनेक मान्यवरांनी नव वधूवरांना भावी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे पुरस्कारर्थींना सुद्धा भावी आयुष्यात उज्वल कार्य करण्यासाठी बळ मिळावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *