1 min read

1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त व टप्याटप्याने अनुदानावर आलेले शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी जुन्या पेन्शन साठी आझाद मैदानावर…

Loading

२००५ पूर्वी नियुक्त शिक्षक शिक्षकेतरांचे जुनी पेंशनसाठी पुन्हा आंदोलन

मुंबई (आझाद मैदान) : १ नोव्हेंबर २००५ पूर्वी विनाअनुदान , अंशत: अनुदानावर आलेल्या व त्यानंतर १००% अनुदानावर असलेल्या राज्यातील सुमारे २७००० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना १९८२ ची जुनी पेंशन मिळावी , या मागणीसाठी शासनाकडे वेळोवेळी मागणी करुनही शासन निर्णय होत नसल्यामुळे महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन समन्वय संघाच्या वतीने ३ मे २०२३ पासुन आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत सुरु असलेल्या आंदोलनास महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेच्या वतीने राज्य कार्याध्यक्ष ज्ञानदेव हांडे व मुंबई मनपा सचिव विनोद जाधव यांनी पाठिंब्याचे पत्र दिले. हजारो शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले आहेत.
या कर्मचार्‍यांना जुनी पेंशन लागू झाल्याशिवाय आंदोलन मागे घेतल जाणार नाही त्यामुळ जास्तीत जास्त पीडित कर्मचार्‍यांनी आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटने राज्य कार्याध्यक्ष ज्ञानदेव हांडे यांनी केले.
आंदोलन यशस्वी करण्यासाठी मा. आमदार दत्तात्रय सावंत , मा. आमदार श्रीकांत देशपांडे , मुख्य समन्वयक सुनिल भोर , सचिन नलावडे , बाबा पाटील , संजय वाळे तसेच समन्वय संघाचे सर्व सदस्य प्रयत्न करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *