दुर्मिळ वन्यजीव प्रजातींचे संरक्षण करणे गरजेचे ; बालासाहेब शिंदे
![]()

दुर्मिळ वन्यजीव प्रजातींचे संरक्षण करणे गरजेचे ; बालासाहेब शिंदे
/ प्रतिनिधी
वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ या कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याने वन्य प्राण्यांचे संरक्षण धोक्यात आले आहे. वन्य प्राण्यांचे संरक्षण, करण्यासंबंधी सामान्य नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची गरज निर्माण झाली आहे. जागतिक प्राणी दिनाच्या पृष्ठभूमीवर वन्यजीव सप्ताहच्या माध्यमातून वन्य प्राण्यांचे संरक्षणाची गरज सर्वसामान्यांपर्यंत पोहचविणे महत्त्वाचे आहे.असे मत प्राणीसंवर्धक, प्राणीमित्र तथा पर्यावरणप्रेमी बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर यांनी व्यक्त केले.
शुक्रवार दि.५ एप्रिल रोजी अतनुरात प्राणीसंवर्धक, प्राणीमित्र, प्राणीप्रेमी कार्यकर्ता वन्यजीव संरक्षण कायदा, प्राणी कायदा, प्राणीसंवर्धक कायदयाविषयक अधिवासासह वन्यजीवांना चांगले संरक्षण प्रदान करण्यासाठी महत्वपुर्ण अधिवास माहिती बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
पुढे बोलताना म्हणाले की, जंगलात असलेल्या अन्नसाखळीमधील वाघ हा मुख्य घटक आहे. तसेच वाघामुळे जंगलात असलेल्या वनस्पतींचे आणि इ तर तृणभक्षी प्राण्यांमध्ये समतोल राखला जातो. त्यामुळे वाघांचे संरक्षण होणे गरजेचे असते. तसेच वनसंपदेमुळे सर्व प्राणिमात्रांसाठी आवश्यक असलेला ऑ िक्सजन, मुबलक पाणी, आणि जमिनीची धूप थांबण्यासही मदत होते. त्यामुळे जंगलांसाठी सर्व वन्यजीव वाचविणे गरजेचे आहे. वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी पोषक वातावरण तयार करून, त्यांचे प्रजनन वाढवून त्यांच्या संख्येत वाढ करणे हा प्रमुख उद्देश समोर ठेवून प्राणीसंवर्धक, प्राणीमित्र, प्राणीप्रेमी व वन विभागाने कार्य करावे. सध्या मोठमोठय़ा वनक्षेत्रांमध्ये वन्य प्राण्यांची संख्या झपाट्याने कमी होत चालली आहे. त्यामुळे त्याच्या संवर्धनाकरिता वन्य प्रेमींकडून प्रयत्न होणे गरजेचे आहे.
स्वातंत्र्योत्तर काळात भारतात आधी मुबलक असलेल्या वन्यजीवांचे नामशेष होणे अधोरेखित झाल्याने राष्ट्रीय पातळीवर वन्यजीवांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी कायदा करणे आवश्यक झाले. भारतीय राज्यघटनेत केंद्र सरकारच्या तसेच राज्य सरकारच्या अधिकारांचे विभाजन केलेले आहे. प्राणी आणि पक्षी यांविषयी कायदे करण्याचा अधिकार राज्य सरकारांच्या अखत्यारीत असल्याने केंद्र सरकारला या विषयावर कायदे करण्यासाठी दोन किंवा अधिक राज्य सरकारांची संमती आवश्यक होती. ११ राज्यांनी संमती दिल्यामुळे ‘वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ ’ हा केंद्रीय कायदा संमत करणे शक्य झाले आणि संपूर्ण देशासाठी एक कायदा अस्तित्वात आला.वन्यजीव (संरक्षण) कायदा,१९७२
वन्यजीवांची अवैध शिकार आणि तस्करी रोखण्यासाठी भारत सरकारने वन्यजीव (संरक्षण) कायदा,१९७२ पारित केला.तसेच पक्ष्यांच्या लुप्त होत चाललेल्या प्रजातींचे जतन करण्यासाठी वैयक्तिक म्हणून तुम्ही कसे योगदान देऊ शकता? धोक्यात असलेल्या प्राणी आणि पक्ष्यांच्या संरक्षणासाठी आपण सर्वजण खालील प्रकारे योगदान देऊ शकतो: त्यांची घरे नष्ट न करून. जंगलतोड थांबवून. शिकार आणि शिकार थांबवून. तसेच वन्यजीव म्हणजे पर्यावरण राखण्यात कशी मदत होते याचा अर्थ काय?
कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय जंगलात वाढणारे किंवा जगणारे प्राणी वन्यजीव म्हणून ओळखले जातात. वन्यजीवांचे महत्त्व खालीलप्रमाणे आहे: वन्यजीव अन्नसाखळी स्थिर ठेवण्यास आणि त्याद्वारे पर्यावरणीय स्थिरता राखण्यास मदत करतात . हे विविध नैसर्गिक प्रक्रियांची स्थिरता राखण्यास देखील मदत करते.आपण जागतिक वन्यजीव दिन का साजरा करतो? २० डिसेंबर २०१३ रोजी, संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या अठ्ठाव्या सत्रात जगातील वन्य प्राणी आणि वनस्पतींविषयी जागरुकता साजरी करण्यासाठी आणि जागृती करण्यासाठी ३ मार्च हा जागतिक वन्यजीव दिवस म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला. आणि वनसंवर्धन महत्त्वाचे का आहे?
लाकूड आणि इमारती लाकूड उत्पादनांचे शाश्वत उत्पादन, अन्न, निवारा आणि उर्जेची तरतूद, हवामान बदल कमी करणे, पाणी आणि मातीचे संरक्षण, तसेच मनोरंजन आणि पर्यावरणीय पर्यटन या जंगलांच्या सर्वात महत्वाच्या भूमिका आहेत. जंगले हे जैविक विविधतेचे महत्त्वाचे भांडारही आहेत. विशेष म्हणजे प्राणी क्लेष प्रतिबंधक कायदा हा राज्यामध्ये १९६० मध्ये लागू करण्यात आला. या कायद्यातील कलम तीनमधील तरतुदीनुसार कोणत्याही प्राण्याचे पालकत्व धारण करणाऱ्या व्यक्तीने संबंधित प्राण्यांची काळजी घेण्यासाठी उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे. या कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन झाल्यास एक ते पाच वर्षांची शिक्षा किंवा दोन ते दहा हजारांपर्यंत दंड होऊ शकतो. या कायद्याची माहिती नागरिकांना होण्यासाठी याबाबतची भित्तीपत्रके जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त किंवा जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांच्या कार्यालयात लावलेली असतात.
या बैठकीस १५ प्राणीसंवर्धक, प्राणीमित्र, प्राणीप्रेमी सह प्राचार्य व्ही.एस.कणसे, प्रा.अविनाश पाटील, भागवत धुमाळ, प्रविण सोमवंशी, भीमराव बिराजदार, शिलरत्न गायकवाड, व्यंकटेश शिंदे, तानाजी सोमुसे, अविनाश शिंदे, कैलास सोमुसे-पाटील, श्रीकांत बोडेवार, संदीप नाईकवाडे उपस्थित होते.

