1 min read

राज्यातील विविध समस्या तातडीने सोडवण्यासाठी शिक्षण आयुक्त यांच्या समवेत बैठक संपन्न

Loading

राज्यातील विविध समस्या तातडीने सोडवण्यासाठी शिक्षण आयुक्त यांच्या समवेत बैठक संपन्न

मुंबई,ठाणे( मनिलाल शिंपी ) महाराष्ट्र राज्यातल्या शाळांच्या विविध शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी कोकण विभाग मतदार संघाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर व पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार श्री जयंत अजगावकर सर यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण आयुक्त माननीय सुरज मांढरे साहेब व त्यांच्या अधिकाऱ्यांसमवेत शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे या ठिकाणी बैठक आयोजित केली होती.

बैठकीमध्ये खालील विषयांवर चर्चा करून तत्काळ मार्ग काढण्यात आला आहे.
1) वैयक्तिक मान्यता जावक नंबरची जुळत नसतील त्या ठिकाणी कार्यवाही करण्यासाठी एक शेड्युल फिक्स करून तारखा दिल्या जातील व तात्काळ , जास्त वेळ न लावता.
11 मुद्द्यातील त सहा अटी शिक्षकांसाठी व तीन ते चार मुद्दे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी पडताळणीमध्ये पहावे असे ठरले, त्यांचा प्रॉब्लेम असेल त्यांना तात्काळ अनुदानाचे आदेश दिले जावेत.
2) विद्यार्थी अपडेट झाल्यानंतर तात्काळ संचमान्यता जनरेट करून शाळांना उपलब्ध करून द्याव्यात असे ठरले.
3) संच मान्यता दुरुस्ती अनेक दिवसापासून होत नाहीत , तीन ते चार वेळा मीटिंग घेऊन सुद्धा प्रश्न का सुटत नाही? म्हणून तात्काळ कारण शोधून एक आठवड्याच्या आत संच मान्यता दुरुस्त करून मिळणार.
4) अघोषित सुमारे 1200 शाळांचे पेंडिंग प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आलेले असून, शासनाकडून त्यावर लवकरच कार्यवाही होईल.
5) शालार्थ आयडी देण्यासाठी तात्काल कार्यवाही केली जाईल.
6) शेवटच्या वर्गाची पटसंख्येची अट शिथिल करण्यासंदर्भात माननीय शिक्षण मंत्री महोदय निर्णय घेणार आहेत.
संचालक स्तरावरचे काही विषय सहाय्यक संचालक माननीय श्री हरून अत्तर साहेब यांच्याकडे अन्य वैयक्ति विषयांवर चर्चा करण्यात आली काही प्रश्न तात्काळ सोडवण्यात आले.
सोबत सुनील जगताप, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष नंदकुमार सागर , ठाणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष गणेश पाटील , सचिव प्रवीण लोंढे, एकनाथ आमले , अन्य शिक्षक विविध संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशी माहिती संपर्क प्रमुख
विष्णू विशे यांच्याकडून देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *