जुनी पेन्शन आता नाही तर कधीच नाही – मा. शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत
![]()

जुनी पेन्शन आता नाही तर कधीच नाही – मा. शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत
१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त विनाअनुदानित किंवा अंशतः अनुदानित शाळेवरील कर्मचाऱ्यांची परिस्थिती आज ना घर का ना घाट का अशी झाली आहे. कारण २००५ पूर्वीच्या शिक्षकांना जुनी पेन्शन आहे व ३१ मार्च २०२३ च्या शासन आदेशानुसार नंतर नियुक्त शिक्षक, शिक्षकेतर सेवकांना पेन्शनच्या अनुषंगाने काही लाभ मिळाले आहेत. परंतु या दोघांच्या मधीच अडकलेल्या कर्मचाऱ्यांचे काय? त्यांना पेन्शन ही नाही आणि लाभही नाहीत म्हणून ३ मे पासून आझाद मैदानावर मा. शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत सर यांच्या मार्गदर्शनाखाली व समवेत हजारो कर्मचाऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
ही पहिलीच वेळ नाही उपोषणाची. समस्थ शिक्षकांचे म्हणणे वेगवेगळ्या सरकार दरबारी मांडून, निवेदने देऊन, चर्चा करून, वेळप्रसंगी आंदोलन करून शिक्षकांना न्याय दिला. आपल्यासोबत पदवीधर व शिक्षक आमदारांची मोट बांधून जुन्या पेन्शनचा प्रश्न सरकार व जनतेसमोर मांडला.
वर्धा शेगाव ते नागपूर आणि भिडे वाडा पुणे ते मंत्रालय मुंबई जुन्या पेन्शनसाठी पायी दिंडी काढली. या दिडींने महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले
जुनी पेन्शन जोपर्यंत माझ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मिळत नाही तो पर्यंत मी शिक्षक आमदाराचे वेतन, पेन्शन व डोक्यावर फेटा बांधणार नाही…. असा पण केला आणि खरेच आजपर्यंत पेन्शन घेतली नाही आणि फेटा ही बांधला नाही.
महाराष्ट्रातील ३५० तालुक्यातील २००५ पूर्वी अंशतः अनुदानित २६८०० शिक्षक शिक्षकेतर सेवक आहेत. त्यातील पुढील चार पाच वर्षात अनेकजण निवृत्त होत आहेत, बिगर पेन्शनचे काही निवृत्त झालेत. तर काहींचे दुख:द निधन झाले आहे
शिक्षकांना नैसर्गिक न्यायाने जुनी पेन्शन मिळे हक्क असताना सरकारने दिली नाही. म्हणून आता आर या पार म्हणत महाराष्ट्रातील तमाम शिक्षकांना पुन्हा हाक देऊन कोणत्याही प्रकारची वर्गणी, निधी न घेता, त्यांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून पंढरपूरहुन मंडप घेऊन, पिण्याच्या पाण्याची सोय व जेवणाची मोफत सोय करून शिक्षकांबरोबर स्वतः बेमुदत उपोषणास सुरवात केली
कोण करेल ऐवढे शिक्षकांसाठी, काय दिले आपण त्यांना फक्त एक मत. रात्रंदिवस हा माणूस फक्त शिक्षकांसाठी झटतोय, पळतोय. कधीही फोन करा. माणूस हजर असा आमदार आपल्यातील काही नालायक, बेजबाबदार, काही पैशाच्या मागे धावून आपला माणूस घालवला. त्याची किंमत आज शिक्षकांना कळाली.
पण काही उमेदवार प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे पक्षांशी लागेबंध करून त्यांनी न केलेले काम खोट्या, आभासी मार्केटिंगच्या मोहजाळात दाखवून फेसबुक, ट्विटर ,व्हॉट्स ॲप किंवा अन्य समाज माध्यमाच्या वापर करून केलेल्या फसव्या कामाच्या आधारावर व पैश्याच्या जोरावर मत मागून लायकी नसताना आमदार झालेत. त्याना काय माहित शिक्षकांचे दुख: आज परिस्थिती अशी आहे शिक्षक आमदार दाखवा हजार रूपये कमवा
पण आमचा शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत सर यांना कुठेही जाहिरात करायची किंवा काम दाखवायची गरज नाही. सदैव कामासाठी तत्पर. शिक्षकेत्तर कर्मचारी व शिक्षकांच्या प्रश्नांची जाणीव असणारा व तेवढ्याच तळमळीने काम करणारा, शैक्षणिक कामाविषयी स्वतःला पूर्णपणे वाहून घेणारा, विविध मोर्चे आंदोलने यामध्ये हिरीरीने सहभागी व निर्भिडपणे नेतृत्व करणारा, शैक्षणिक प्रश्न व चळवळ म्हणजे नेमकं काय याचं भान असणारा व चळवळीत प्रश्नांसाठी चांगल्या अर्थाने वळवळ करणारा, सामाजिक भान असणारा, स्वतःच्या ज्ञान व माहितीच्या आधारावर प्रश्न तडीस नेणारा असा एकच लढाऊ शिक्षक आमदार मा. दत्तात्रय सावंत सर
म्हणून सांगतो आता आर या पारची लढाई सुरू झाली आहे. शाळेला सुट्टी आहे. लवकर उपोषणात सहभागी व्हा. या उपोषणाची दखल सरकारला घ्यावीच लागेल. जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे….. आम्ही आलोय….. तुम्ही ही या….
श्री हनुमंत (उदयसिंह)शिवाजी धावणे पाटील
*संचालक, महाराष्ट्र शाळा कृती समिती सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक, शिक्षकेत्तर सेव सह. पतसंस्था पंढरपूर,

