1 min read

अध्यात्मविद्या असेल तरच जिवन परिपूर्ण होऊ शकते- ह.भ.प डॉ रविंद्र भोळे उरुळीकांचन

Loading

अध्यात्मविद्या असेल तरच जिवन परिपूर्ण होऊ शकते….. ह.भ.प डॉ रविंद्र भोळे उरुळीकांचन

दौंड बोरी एंदीं:विज्ञानाच्या विविध संशोधनाद्वारे मानव भौतिक उन्नतीकडे जात असताना मानवाच्या अस्तित्वाला व शांततेला धोका निर्माण झाला. मनुष्याच्या सर्वांगीन उत्कर्षासाठी अन्न, अक्षर, आरोग्य व आचरण महत्वाचे तर आहेच मात्र अध्यात्मिक ज्ञान तेव्हढेच महत्वपुर्ण आहे. भौतिक सुख प्राप्तीसाठी विज्ञान आहे मात्र मानसीक, आत्मिक शांतीसाठी अध्यात्म विद्या महत्व पुर्ण आहे . मनुष्याचा सर्वांगीन विकास होण्यासाठी, जीवनाचे रहस्य जाणून घेण्यासाठी तसेच मोक्ष प्राप्तीकरिता व खऱ्या सुखाचा उलगडा होण्यासाठीच सद्गुरू महत्वाची भूमिका बजावतात. ह्यासाठी ग्रंथ, सद्गुरु महत्वाचे आहेत. अध्यात्म विद्या असेल तरच जीवनात आत्मिक मानसिक शांति मिळू शकते. अध्यात्म विद्या असेल तरच जीवन परिपूर्ण होऊ शकते असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार हभप डॉ रविंद्र भोळे यांनी येथे व्यक्त केले . दौंड तालुक्यातील बोरी ऐंदीं तेथे गवकरी व श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, गाथा समितीच्या वतीने अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. ह्या वेळी जेष्ठ समाजसेवक प्रवचनकार डॉ रविंद्र भोळे ह्यांचे प्रवचन झाले. मार्गदर्शन करताना डॉ रविंद्र भोळे पुढे म्हणाले की अध्यात्मामुळे धार्मिक प्रवृत्ती वाढते व दया निर्माण होऊन धर्म धारण केला जातो. धर्मामुळे दया, क्षमा, शांति मिळू शकते. ह्या प्रसंगी भाविक भक्त, अनेक हभप महाराज, गावकरी श्रोते बहुसंख्येने उपस्थित होते. डॉ रविंद्र भोळे हे वारकरी विचार मंच महाराष्ट्र राज्य संघटनेचे वैद्यकिय प्रमुख असून महाराष्ट्रात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *