1 min read

महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दलाचे (RSP) प्रशिक्षण वर्गाचे आयोजन, भारतीय सैनिकी विद्यालयाकडून आर एस पी अधिकारी शिक्षक प्रशिक्षणास सर्वोतोपरी सहकार्य राहील: प्राचार्य तोरवणे

Loading

महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दलाचे (RSP) प्रशिक्षण वर्गाचे आयोजन.. भारतीय सैनिकी विद्यालयाकडून आर एस पी अधिकारी शिक्षक प्रशिक्षणास सर्वोतोपरी सहकार्य राहील: प्राचार्य तोरवणे

ठाणे( मनिलाल शिंपी): महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन, नागपूर अंतर्गत राज्य संघटनेचे अध्यक्ष संजयराव शेंडे, महासमादेशक पी एस महाजन व मधुकरराव तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली, राज्य संघटनेचे उपाध्यक्ष हिराजी पाटील, विभागीय समादेशक ॲड.के डी पाटील यांच्या नियंत्रणाखाली व ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षण अधिकारी श्रीमती ललिता दहिदुले यांच्या आदेशानुसार, भारतीय सैनिकी विद्यालय, खडवली (पूर्व) जि.ठाणे येथे आर एस पी अधिकारी शिक्षक प्रशिक्षण वर्गाचे दिनांक ५ मे २०२३ पासून आयोजन करण्यात आले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, सध्याच्या काळात अति वेगाने धावणारी वाहने, वाहतूक नियमांची पायमल्ली, अपुऱ्यावरून रस्त्यावर हजारो लोकांची वर्दळ यामुळे अपघातांचे प्रमाण अतिशय वाढले आहे. यासाठी राज्य वाहतूक सुरक्षा व नागरी संरक्षण संघटना (RSP & CD) शाळांमधून अधिक प्रमाणात प्रभावशाली राबवून वाहतूक नियमांच्या जनजागृतीचे उपक्रम आयोजित करून, अपघात टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना लहान वयातच शालेय अभ्यासक्रमा द्वारा वाहतुकीचे प्रशिक्षण, वाहतुकीचे नियम, शिस्त, देश प्रेम, स्वसंरक्षण, व इतरांचे अपघातात पासून संरक्षण व्हावे इत्यादी सर्व बाबतीत समाजात जागृती प्रसार करणे आवश्यक आहे. उपक्रम सुट्टीच्या कालावधीत पोलीस विभाग व शिक्षण विभाग अंतर्गत राबवले जातात. त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन नागपूर अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील आर एस पी अधिकारी शिक्षक प्रशिक्षण वर्गाचे भारतीय सैनिकी विद्यालय, खडवली, ता.शहापूर,जिल्हा ठाणे, या ठिकाणी दिनांक ५ मे ते १४ मे २०२३ पर्यंत आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षण वर्गासाठी ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती ललिता दहिदुले यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील इच्छुक शिक्षकांनी व प्रत्येक शाळेतून किमान एक शिक्षक प्रशिक्षण वर्गासाठी पाठवावा असे निर्देश देण्यात आले आहेत.या प्रशिक्षण वर्गासाठी,ठाणे जिल्हा जिल्हाधिकारी यांचामार्फत एन डी आर एस ( आपत्कालीन ) आपत्कालीन विभागाचे प्रॅक्टिकलसह मार्गदर्शन लाभणार आहे.तसेच ठाणे जिल्हा वाहतूक उपायुक्त डॉ.राठोड साहेब यांनी विशेष कौतक करत दोन प्रशिक्षक उपलब्ध करून दिले आहेत, तसेच ठाणे जिल्हा पोलिस अधिक्षक देशमाने साहेब यांनी आर एस पी अधिकारी शिक्षक प्रशिक्षक यांना विशेष ट्रेगिंग साठी पाच दिवस दोन डी. आय देण्याचे आदेश दिले आहेत. तरी जास्तीत जास्त शिक्षक बंधू-भगिनींनी या प्रशिक्षणात सहभागी व्हावे असे आवाहन राज्य वाहतूक सुरक्षा दलाचे उपाध्यक्ष हिराजी पाटील व विभागीय समादेशक ॲड.के डी पाटील यांनी केले आहे, प्रशिक्षण वर्गासाठी शिबिर प्रमुख म्हणून ठाणे शहर व नवी मुंबई समादेशक दिलीप स्वामी, व मनिलाल शिंपी हे काम पाहत असून, भारतीय सैनिकी विद्यालयाचे प्राचार्य रविंद्र तोरवणे, उपप्राचार्य महेश भावसार, वसतिगृह व्यवस्थापक राजेंद्र चव्हाण, यांच्यासह सर्वांचे मोलाचे सहकार्य मिळत आहे. आर एस पी अधिकारी शिक्षक प्रशिक्षण आमचा शाळेत आयोजित केले याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, या प्रशिक्षणासाठी जे काही सहकार्य आणि जी मदत करता येईल ती नक्की करनार असे प्राचार्य रविंद्र तोरवणे यांनी सांगितले.जिल्हा समादेशक दिलीप स्वामी व मनिलाल शिंपी यांनी प्रशिक्षण केंद्राची संपूर्ण पाहणी केली.यावेळी आर एस पी अधिकारी किरण वसईकर व शरद बोरसे यांचेही सहकार्य मिळाले. या प्रशिक्षणासाठी भारतीय सैनिकी विद्यालय संस्थेचे अध्यक्ष, व ऑल इंडिया मेडिकल केमिस्ट्री रजिस्टर असोसिएशनचे अध्यक्ष मा.आमदार जगन्नाथ आप्पा शिंदे यांनी शाळा व हॉस्टेल उपलब्ध करून दिले आहे. सर्वांचे लाडके आणि शिक्षकांचे कैवारी ,शिक्षक आमदार आदरणीय डॉ.श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्याकडून विशेष सहकार्य आणि शुभेच्छा देण्यात येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *