देश रक्षणाचे पार पाडुनी कर्तृत्व
माझा मित्र निवृत्ती होतोय निवृत्त..
![]()


देश रक्षणाचे पार पाडुनी कर्तृत्व
माझा मित्र निवृत्ती होतोय निवृत्त..
प्रत्येक तरुणाचे जीवनात काही ना काही स्वप्न असतं. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येक तरुण लहानपणापासून धडपड करीत असतो. माझ्या प्रभागातील माझे मित्र निवृत्तीभाऊ महाजन यांनी लहानपणापासूनच भारत मातेचे रक्षण करण्याचे स्वप्न उराशी बाळगलं होतं. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांची लहानपणापासूनच धडपड सुरू होती. अखेर त्यांच ते स्वप्न 30 एप्रिल 2001 रोजी पूर्ण झाले.त्यांची भारतीय सैन्यदलात निवड झाली. 16 एप्रिल 2001 रोजी त्यांचे नाशिक येथे आर्मीचे प्रशिक्षण सुरू झाले. नऊ महिने प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना 25 फेब्रुवारी 2002 रोजी उत्तर प्रदेशातील मेरठ येथे आर्टिलरी युनिट 207 या ठिकाणी पोस्टिंग मिळाली. 2002 ते 2005 तीन वर्ष जम्मू काश्मीर येथे देश सेवा केल्यानंतर 2005 ते 2009 अशी चार वर्ष अलवर, राजस्थान येथे देशसेवेचे कर्तव्य पार पाडले. 2009 ते 2012 अशी तीन वर्ष जम्मू काश्मीर येथील लेह-लडाख या ठिकाणी आर्मी एव्हिएशन मधील “हेलिकॉप्टर डिव्हिजन” मध्ये सेवा बजावली. त्यानंतर 2012 ते 2016 चार वर्ष पठाणकोट, पंजाब येथे देश संरक्षणाचे कार्य पार पाडले. 26 जानेवारी रोजी देशाच्या प्रजासत्ताक दिनी दिल्ली येथील परेडमध्ये सहभाग नोंदवला. त्यानंतर 2016 ते 2020 हे चार वर्ष आसाम मधील मिसामारी या ठिकाणी देश संरक्षणाचे कर्तव्य पार पाडले. या चार वर्षात चीन येथील तवांग येथेही देश संरक्षणाची संधी मिळाली. शेवटी निवृत्ती भाऊ यांच्या आयुष्यातील सुवर्णक्षण आला तो म्हणजे त्यांना 2020 ते 2023 या तीन वर्षासाठी पुन्हा नाशिक येथील एविएशन आर्मी मधील हेलिकॉप्टर डिव्हिजन मध्ये सेवा करण्याची संधी मिळाली. अखेर निवृत्ती भाऊ महाजन 30 मार्च 2023 रोजी भारतीय सैन्य दलातून देश सेवा पूर्ण करून निवृत्त झाला.
निवृत्तीभाऊ महाजन यांनी नेहमी भारत मातेला आई मानत व भारत देशाला आपलं परिवार मानत स्वतःच्या परिवाराची काळजी न करता देशाची काळजी व देशाची संरक्षणाची सुरक्षेची जबाबदारी पार पाडली. निवृत्ती भाऊ महाजन यांच्या देश सेवेच्या महान कार्याला माझ्या लांबोळे परिवाराकडून व प्रभाग 17 मधील नागरिकांकडून सलाम व निवृत्तीभाऊ यांना भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा..
निवृत्तीभाऊ महाजन यांच्या 22 वर्ष देश सेवापुर्ती नंतर अमळनेर मध्ये जाहीर स्वागत, सत्कार समारंभ व मिरवणुकीचा कार्यक्रम 24 एप्रिल 2023 रोजी संपन्न होत आहे तरी जास्तीत जास्त अमळनेरकरांनी निवृत्तीभाऊ यांच्या मिरवणुकीत सहभागी होऊन त्यांच्या देश सेवेच्या महान कार्याला सलाम करावे.
हे आपणांस मी नम्रपणे आवाहन करीत आहे.🙏🙏
मिरवणुकीची सुरूवात
स्थळ :विजय मारुती मंदिर अमळनेर
दि.24 एप्रिल 2023.
वार : सोमवार रोजी.
मिरवणुकीची वेळ : संध्याकाळी 6 : 00 वा.
आपलाच,
श्री विनोद रामचंद्र लांबोळे,(बिजू नाना)
मा.उपनगराध्यक्ष अमळनेर नगरपरिषद अमळनेर, जळगाव.

