शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे त्रे मासिक मुखपृष्ठाचे संपादक मंडळ जाहीर
![]()

शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे त्रे मासिक मुखपृष्ठाचे संपादक मंडळ जाहीर
शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर जिल्हा जळगावची नुकतीच झूम मीटिंग संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली याप्रसंगी फाउंडेशनचे मुखपृष्ठ असावे व त्यासाठी संपादक मंडळ असावे अशा प्रकारची चर्चा मागील झूम मीटिंगमध्ये करण्यात आली होती हा विषय डॉ. उज्जैनकर यांनी मांडलेला होता व त्याप्रमाणे सर्व पदाधिकाऱ्यांनी या विषयाला अनुमोदन दिले त्याप्रमाणे डॉ.उज्जैनकर यांनी फाउंडेशनच्या त्रेमासिकाचे संपादक मंडळ पुढीलप्रमाणे जाहीर केले. संपादक राज्य सचिव छत्रपती संभाजीनगर येथील प्रा. डॉ. सुभाष बागल, सहसंपादक राज्य संपर्कप्रमुख कोल्हापूर येथील डॉ. श्रीकांत पाटील, सहसंपादक राज्य समन्वयक मुंबई येथील सौ. लताताई गुंठे सदस्य कार्यकारिणी सचिव श्री प्रमोद पिवटे मुक्ताईनगर राज्य सल्लागार अकोला येथील श्री तुळशीराम बोबडे खामगाव येथील श्री पांडुरंग दैवज्ञ फोंडा, गोवा येथील डॉ. अनिता तिळवे, ठाणे जिल्हा समन्वयक श्री रमेश उज्जैनकर पुणे जिल्हा समन्वयक श्री तान्हाजी बोऱ्हाडे आदी सदस्य तर पुढील सल्लागार मंडळ जाहीर करण्यात आले राज्य अध्यक्ष अमरावती येथील डॉ. सतीश तराळ राज्य उपाध्यक्ष पुणे येथील डॉ. प्रतिमा इंगोले गोवा राज्य संपर्कप्रमुख अँड अजितसिंह राणे कार्यकारणी सदस्य श्री विनायक वाडेकर मुक्ताईनगर बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुख प्राचार्य डॉ. पंढरीनाथ शेळके अँड सर्जेराव साळवे छ. संभाजीनगर जिल्हा संपर्कप्रमुख आदी पदाधिकाऱ्यांचा या त्रैमासिक फाउंडेशनच्या मुखपृष्ठाच्या संपादक मंडळामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. या सर्व मान्यवरांचे पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

