साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात ग्रंथ दिन साजरा…
![]()

साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात ग्रंथ दिवस साजरा…
अमळनेर प्रतिनिधी- सानेगुरुजी मोफत वाचनालयात 23 एप्रिल पुस्तक दिन साजरा प्रसंगी पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाचे स्पर्धा परीक्षा संचालक विजयसिंह पवार यांनी सांगितले की मानवी जीवनात ग्रंथाचे स्थान अनन्यसाधारण असे आहे. ग्रंथ वाचनाने माणूस समृद्ध होतो, हे सार्वत्रिक सत्य आहे. ग्रंथाचे हे महत्व लक्षात घेऊन जगभरात 23 एप्रिल या दिवशी जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो. 23 एप्रिलला इंग्रजी नाटककार शेक्सपियर यांचा जन्मदिवस आहे, तसेच त्यांचा तो मृत्युदिनही आहे. शेक्सपियर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 23 एप्रिल या दिवशी जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा होतो. अमळनेर येथील स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांनी अनेक वाचनीय पुस्तक सानेगुरुजी वाचनालयात उपलब्ध करून दिले आहेत त्याचा त्यांनी फायदा घ्यावा असे त्यांनी सांगितले…
यावेळी साने गुरुजी वाचनालयाचे उपाध्यक्ष प्रा डॉ माधुरी भांडारकर , वाचनालयाचे विश्वस्त चंद्रकांत नगावकर ,संचालक एडवोकेट रामकृष्ण उपासनी , ईश्वर महाजन, ग्राहक फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब हेमंत भांडारकर ,आरटीओ स्वप्निल वानखेडे व वाचनालयाचे कर्मचारी व वाचक प्रेमी, स्पर्धा परीक्षेची विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी व वाचकांसाठी पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली होती.




