1 min read

97वे अखिल भारतीय साहित्य संमेलन अमळनेरलाच मिळावे म्हणून खान्देश साहित्य संघाचे निवेदन…

Loading

97वे अखिल भारतीय साहित्य संमेलन अमळनेरलाच मिळावे म्हणून खान्देश साहित्य संघ जळगावने दिले निवेदन…

पुढील वर्षी होऊ घातलेले *"97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन"* अमळनेरला मिळावे म्हणून काल अखिल भारतीय मराठी महामंडळाचे पदाधिकारी स्थळ निरीक्षणासाठी आले असता त्यांना खान्देश साहित्य संघ जळगाव तर्फे अमळनेरलाच पुढील संमेलन द्यावे ही आग्रही भूमिका व सर्वतोपरी सहकार्य असल्याची लेखी हमी यानिमित्तने दिली. यावेळी स्थळनिरीक्षण समितीच्या डॉ. उज्वला मेहेंदळे, श्रीम. सुनिताराजे पवार, प्रा. किरण सरगर, श्री. रमेश वंसरकर, श्री. नरेंद्रजी पाठक, श्री. प्रदीप दाते इत्यादी पदाधिकारी तसेच आयोजक अमळनेरच्या मराठी वाङ्मय मंडळाचे पदाधिकारी, खान्देश साहित्य संघ, जळगाव, म.सा.प.अमळनेर, सानेगुरुजी शैक्षणिक साहित्य मंच अमळनेरचे पदाधिकारीही उपस्थित होते. उद्या दि. 23/04/2023 रविवारी पुढील साहित्य संमेलनाचे ठिकाण घोषित होईल. आम्हाला आशा व अपेक्षा आहे की अमळनेरलाच पुढील संमेलनाची जबाबदारी मिळेल..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *