‘मावळ मराठा’च्या वतीने देण्यात येणारा प्रदिर्घ उल्लेखनिय पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार गो. पि. लांडगे यांना प्रदान
![]()

‘मावळ मराठा’च्या वतीने देण्यात येणारा
प्रदिर्घ उल्लेखनिय पत्रकारिता पुरस्कार
ज्येष्ठ पत्रकार गो. पि. लांडगे यांना प्रदान
धुळे- मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय उपाध्यक्ष, धुळे येथील ज्येष्ठ पत्रकार गो. पि. लांडगे यांना मुंबई येथील ‘सा. मावळ मराठा’ च्या वतीने मावळ मराठाच्या 19व्या वर्धापन दिनानिमित्त संपादक सदानंद खोपकर व सौ. सिमंतीनी खोपकर (चेंबुर-मुंबई) यांनी लांडगे यांच्या निवासस्थानी येऊन ‘प्रदिर्घ उल्लेखनीय पत्रकारिता पुरस्कार, सन्मानपत्र मावळ मराठा पुरस्कार-2023’ धुळे ग्रामीणचे माजी आमदार प्रा. शरद पाटील यांच्या हस्ते, धुळे जिल्हा तालीम संघाचे उपाध्यक्ष मल्ल चंद्रकांतनाना सैंदाणे यांच्या अध्यक्षतेखाली निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी श्रीपाद नांदेडकर यांच्या उपस्थितीत घरीच एका छोटेखानी कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. या पुस्काराचे वैशिष्ट्य म्हणजे ‘मावळ मराठा’ चे संपादक सदानंद खोपकर दाम्पत्य हे संबंधित पत्रकारांच्या योगदानाची माहिती घेऊन पुरस्कारार्थींच्या जिल्ह्यात जावून प्रदान करीत असतात. यापूर्वी हा पुरस्कार वसंत देशपांडे दादा, दिनू रणदिवे, यशवंत मुळ्ये आबा, विकास सबनिस, रिंगणकार सचिन परब, ज्येष्ठ पत्रकार चित्रकार प्रकाश जोशी, नरहरी भागवत (नाशिक), गुरुराज सावकार (गोवा), कै. विजय भोसले (पुणे), रत्नाकर पंडीत सर (कोल्हापूर) यांना प्रदान करण्यात आला होता. या घरगुती कार्यक्रमाचे सुत्रसंचलन किसन फन्से सर यांनी केले होते.

