भारताचे माजी परराष्ट्र सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांची डॉ. शिवचरण उज्जैनकर यांनी पुणे येथे घेतली भेट
![]()


भारताचे माजी परराष्ट्र सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांची डॉ. शिवचरण उज्जैनकर यांनी पुणे येथे घेतली भेट
भारताचे माजी परराष्ट्र सचिव तथा सदस्य मानवाधिकार आयोग भारत सरकार डॉ.ज्ञानेश्वर मुळे साहेब यांची नुकतीच पुणे येथील रॉयल्टी हॉटेल येथे शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांनी नुकतीच भेट घेतली याप्रसंगी याप्रसंगी डॉ. ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशनचे अध्यक्ष श्री राज देशमुख तथा सुप्रसिद्ध सूत्रसंचालक व करिअर गाईड प्रा. निशिकांत धुमाळ आणि उज्जैनकर फाउंडेशनचे राज्य समन्वयक प्रा. डॉ. राजकुमार कांकरिया, पुणे जिल्हा समन्वयक श्री तान्हाजी बोऱ्हाडे फाउंडेशनचे आजीव सदस्य चि. सचिन उज्जैनकर व चि. अरविंद उज्जैनकर यांची उपस्थिती होती याप्रसंगी शिवचरण उज्जैनकर यांनी डॉ. ज्ञानेश्वर मुळे साहेबांसोबत विविध साहित्यिक तसेच फौंडेशनच्या विविध उपक्रमाविषयी एक तास चर्चा केली नोव्हेंबर मध्ये फाउंडेशनचे तिसरे अखिल भारतीय शिव मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन सुद्धा या भेटीमध्ये करण्यात आले पन्हाळा जिल्हा कोल्हापूर येथील संमेलना प्रसंगी डॉ. मुळे साहेब यांनी उज्जैनकर फाउंडेशनचे पुढील संमेलन दिल्लीमध्ये आयोजित करण्यात येईल असेही त्यांनी जाहीर केले होते त्याविषयी सुद्धा या प्रसंगी चर्चा करण्यात आली.

