1 min read

सुंदर माझा दवाखाना अभियानात,,, भडणे उपकेंद्र झाले सुंदर
जिल्हा परिषद व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून उपकेंद्राचा कायापालट

Loading

,,,सुंदर माझा दवाखाना अभियानात,,, भडणे उपकेंद्र झाले सुंदर
जिल्हा परिषद व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून उपकेंद्राचा कायापालट

शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील प्राथमिक उपकेंद्र विखरण अंतर्गत येणारे भडणे उपकेंद्रात, तालुका आरोग्य अधिकारी व विखरण येथील वैद्यकीयआरोग्य अधिकारी डॉक्टर जुबेर कुरेशी मार्गदर्शनाखाली भडने येथील उपकेंद्रात आरोग्य सेविका आरोग्य सेवक आशा वर्कर यांनी स्वच्छता मोहीम राबवून तसेच परीसर साफसफाई करून आरोग्य केंद्र अतिशय स्वच्छ व उत्कृष्ट झाल्यामुळे अतिशय सुंदर व विलोभनीय दिसत आहे भडणे येथील प्राथमिक उपकेंद्र अंतर्गत हे सोनशेलु हातनुर गाव येतात या गावातील आरोग्य सेविका कवित बोरसे आरोग्यसेवक डॉक्टर राहुल तडवी आशा वर्कर कल्पना पाटील बेबी शिंदे पुष्पाबाई पाटील, यांनी शासनाच्या आदेशानुसार सुंदर माझ्या दवाखाना अभियानात परिसरातील कर्मचारी साफसफाई तसेच जिल्हा परिषद व ग्रामपंचायत च्या माध्यमातून अतिशय दवाखान्याची संरक्षण भिंत रंगरंगोटी फर्निचर तसेच नवीन दवाखान्याची दुरुस्ती शुशोभीकरण व रंग रंगोटी अतिशय उत्कृष्टपणे करून दवाखाना सुंदर करण्यात आल्यामुळे, आजही गावातील नागरिक व सोनशेलु हातनुर येथील, महिला पुरुषवर्ग भडणे येथील उपकेंद्रात भेट देऊन योजनेचा लाभ घेत असतात यासाठी आरोग्य सेविका कविता कोळी डा राहुल तडवी या दररोज महिला व ज्येष्ठ नागरिकांची यांची आरोग्य तपासणी करीत असतात यांच्या या उत्कृष्ट कामाबद्दल प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे विखरण येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जुबेर कृरेशी व जि प सदस्य धनंजय मगळे लोकनियुक्त सरपंच गिरीश पाटील उपसरपंच भाऊसाहेब निकम पोलीस पाटील युवराज माळी पंचायत समिती सदस्य रंजनाबाई पाटील यांनी कौतुक केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *