गणेश धुमाळ आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित..
![]()

गणेश (बापू) धुमाळ यांना आदर्श पत्रकार पुरस्कार प्राप्त
पुणे- अभ्यासू लिखाणाच्या माध्यमातून निर्भीड पत्रकारिता करून प्रशासनाचे लक्ष वेधून जनसामान्य जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न करणारे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ हवेली तालुका उपाध्यक्ष व पुण्यनगरी चे पत्रकार गणेश (बापू) सुदाम धुमाळ यांना ग्रीन फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात येणारा सन २०२३ चा आदर्श पत्रकार पुरस्कार मंगळवार दि. १८ एप्रिल २०२३ रोजी तीर्थक्षेत्र चिंतामणी मंदीर थेऊर येथे वनविभाग अधिकारी वनरक्षक बळीराम वायकर साहेब यांच्या हस्ते गणेशबापू धुमाळ यांना देण्यात आला. या वेळी ग्रीन फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष अमितजगताप,पत्रकार दिगंबर जोगदंड, युवा उद्योजक दिगंबर जगताप उपस्थित होते.
समाजातील घडणाऱ्या घटना प्रतिबिंबित करणारे माध्यम म्हणजे पत्रकारिता क्षेत्र यात देखील ते वेळेचा सदुपयोग करत कार्यरत आहेत.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ हवेली तालुका उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत . सामाजिक बांधिलकी असलेल्या या ध्येयवेड्या आणि कार्यमग्न गणेश (बापू) धुमाळ या व्यक्तीमत्वास असेच समाजहीताचे कार्य करण्यास बळ मिळत राहवे.
आपल्या अनोख्या उपक्रमाच्या शैलीने कायम चर्चेत राहणाऱ्या गणेश (बापू) धुमाळ यांच्या विशेष प्रयत्नाने विविध उपक्रम, मोहीम, प्रकल्प, अभियान यशस्वीरीत्या पार पडली आहेत.
ग्रीन फाउंडेशनचा मानाचा आणि प्रतिष्ठित समजला जाणारा आदर्श पत्रकार पुरस्कार गणेश (बापू) सुदाम धुमाळ यांना देण्यात आला या मध्ये सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र, वृक्ष, शाल ,श्रीफळ देण्यात आले .त्यांना मिळालेल्या पुरस्कराबद्दल त्यांचे हवेली तालुक्यातील विविध स्तरातून कौतुक होत आहे.

