दिनांक 10 जून 2022 च्या शासन निर्णयातील एनओसीची अटट रद्द करावी, शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची मागणी
![]()

दिनांक 10 जून 2022 च्या शासन निर्णयातील एनओसीची अटट रद्द करावी, शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची मागणी
.मुंबई ठाणे ( मनिलाल शिंपी):महाराष्ट्र राज्यातील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यता देण्याकरता दिनांक 10 जून 2022 रोजी पारित झालेल्या शासन निर्णयातील जाहिरातीस ( Noc) परवानगी घेणे बंधनकारक आहे , अशी अट असल्याने शिक्षण विभागात अनेक वर्षापासून प्रस्ताव प्रलंबित आहेत, अनेक शाळांनी अशी परवानगी मिळावी म्हणून वारंवार शिक्षण विभागामध्ये पत्र व्यवहार केलेला होता मात्र एनओसी मिळाली नाही, किंवा काही कारणास्त एनओसी घेता आले नाही. शिक्षकांचे भवितव्य लक्षात घेऊन जाहिरातीस एनओसी ची अट शिथिल करावी, अशी मागणी कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनीीय नामदार दीपकजी केसरकर यांच्याकडे केली आहे.

