1 min read

डॉ रविंद्र भोळे ह्यांना डॉ भीमराव रामजी आंबेडकर नॅशनल प्राइड अवॉर्ड प्रदान

Loading

डॉ रविंद्र भोळे ह्यांना डॉ भीमराव रामजी आंबेडकर नॅशनल प्राइड अवॉर्ड प्रदान

उरुळीकांचन: भारतरत्न डॉ बी आर आंबेडकर चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने देण्यात येणारा पुरस्कार येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ रविंद्र भोळे ह्यांना प्रदान करण्यात आला. सामाजिक, धार्मिक, पर्यावरण, ग्राम स्वच्छता, शैक्षणीक, अपंग सेवा , अंध अपंग, मतिमंद मूकबधिर सेवा,नैसर्गिक आपत्ती कार्ये इत्यादीं क्षेत्रांतील उल्लेखनीय समर्पित भावनेने कार्य केल्याबद्दल डॉ रविंद्र भोळे ह्यांना भारतरत्न डॉ भीमराव रामजी आंबेडकर नॅशनल प्राइड अवॉर्ड प्राप्त झाला आहे. पद्मश्री डॉ मणीभाई देसाई प्रतिष्ठान च्या माध्यमातुन अनेक वोकेशनल कोर्सेस रोजगार निर्मिती साठी राबविलेले आहेत. राज्यभर विवीध संस्थामध्ये डॉ रविंद्र भोळे कार्येरत आहेत. वरील पुरस्कार प्रदान करण्यात आल्याबद्दल चंद्रप्रकाश धोका निवासी मूकबधिर विद्यालय अध्यक्ष सुभाष कट्यारमल सर पेरणे फाटा, युवा भीमसेना सामाजिक संघटना कार्यकर्ते, डॉ नामदेवराव भागूजी डफळ, एल डी साळवे, देविदास कांबळे, टी के महाडीक ह्यांनी जेष्ठ प्रवचनकार, समाजसेवक, अपंगसेवक डॉ रविंद्र भोळे ह्यांचेअभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *