ब्राम्हणशेवगे येथील जलसंधारण व पर्यावरण रक्षण कामांचा पाहणी दौरा संपन्न.
मानवलोक,केअरिंग फ्रेंड, सेवा सहयोग ग्रामोदय प्रकल्प पदाधिकारींचा होता सहभाग.
![]()

ब्राम्हणशेवगे येथील जलसंधारण व पर्यावरण रक्षण कामांचा पाहणी दौरा संपन्न.
मानवलोक,केअरिंग फ्रेंड, सेवा सहयोग ग्रामोदय प्रकल्प पदाधिकारींचा होता सहभाग.
चाळीसगाव /प्रतिनिधी
तालुक्यातील जलसंधारण व पर्यावरण रक्षण या कामांमुळे नावारुपाला येत असलेल्या ब्राम्हणशेवगे येथील कामांचा पाहणी दौरा सेवा सहयोग ग्रामोदय प्रकल्प, भूजल अभियान, चाळीसगाव, मानवलोक संस्था, आंबेजोगाई, केअरिंग फ्रेंड, मुंबई प्रतिनिधींनी नुकताच केला. याप्रसंगी एक गाव एक तलाव, नाला खोलीकरण, गाळ काढणे, या कामांचा फायदा याबाबत शेतकऱ्यांशी संवाद साधला तसेच चालू वर्षी झालेल्या बांधबंदिस्त या कामांची पाहणी केली.
ब्राम्हणशेवगे येथे गेली सात वर्षापासून जलमित्र,पर्यावरण मित्र, भूजल वारकरी सोमनाथ माळी यांचे संकल्पनेतून व प्रयत्नातून जलसंधारण व पर्यावरण रक्षण यावर सातत्याने कामे करण्यात येत आहेत. मागिल पाच वर्षापासून सेवा सहयोग फाऊंडेशनचे गुणवंत दादा सोनवणे यांचे मदतीने मोठ्या प्रमाणात काम करण्यात येत आहेत. यामध्ये प्रामुख्याने नाला खोलीकरण,रुंदीकरण,गाळ काढणे,एक गाव एक तलाव,
शिवार रस्ते, पानंद रस्ते करणे,बांधबंदिस्ति करणे,निसर्गटेकडी प्रकल्प, घनवन वृक्षारोपण,सलग समतल चर,ई.कामे प्रामुख्याने झालेली आहेत.
या जलसंधारण,मृदसंधारण व पर्यावरण रक्षण कामांमुळे गाव नावारुपाला येत आहे. या कामांची पाहणी करण्यासाठी नुकताच सेवा सहयोग ग्रामोदय प्रकल्प, मानवलोक संस्था, केअरिंग फ्रेंड यांच्या प्रतिनिधी व शेतकऱ्यांचा पाहणी दौरा संपन्न झाला. या प्रसंगी मानवलोक आंबेजोगाईचे अनिकेतजी लोहिया, केअरिंग फ्रेंड मुंबईचे ऋषिकेशजी जोशी, सेवा सहयोग ग्रामोदय प्रकल्प, टिमचे गुणवंतदादा सोनवणे, सेवा सहयोग ग्रामोदय प्रकल्प टिम गाव प्रमुख ,भूजल वारकरी ,लोंढे,चिंचगव्हाण,
कळमडू,वडाळा-वडाळी,पोहरे,
दस्केबर्डी,शिदवाडी, ई.शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता.
ब्राम्हणशेवगे येथील निसर्गटेकडी प्रकल्प व ईतर जलसंधारण व पर्यावरण रक्षणाची कामे पाहून सहभागी भूजल वारकरी व शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

