1 min read

ठाणे जिल्ह्यात नवीन शैक्षणिक धोरणावर मार्गदर्शन शिबिर संपन्न शिक्षण मंत्री ना. दीपक केसरकर , अभिनेते विवेक ओबेरॉय, शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची खास उपस्थिती.

Loading

ठाणे जिल्ह्यात नवीन शैक्षणिक धोरणावर मार्गदर्शन शिबिर संपन्न शिक्षण मंत्री माननीय ना. दीपकजी केसरकर साहेब, अभिनेते विवेक ओबेरॉय, शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची खास उपस्थिती.


  • ठाणे ( मनिलाल शिंपी): शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन आणि IKSPLयांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण चर्चा सत्र 2023 आयोजीत कार्यक्रमात राज्याचे शिक्षण मंत्री मा. दिपकजी केसरकर साहेब, कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार मा. ज्ञानेश्वर म्हात्रे सर, कोकण विभाग पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे साहेब, IKSPL या संस्थचे संस्थापक आणि हिंदी चित्रपटातील सुप्रसिद्ध कलाकार मा. विवेकजी ओबेरॉय, शिक्षण , शिक्षण उपसचिव काझी साहेब, नवीन शैक्षणिक धोरणावर मार्गदर्शन करण्यासाठी नेहा बेलसरे मॅडम, प्राध्यापक ढवळ सर, शिक्षण उपसंचालक संदीप सांगवे, आणि अनेक मान्यवार उपस्थीत होते.
    राष्ट्रीय शैक्षणिक धोरण चर्चा सत्रामध्ये आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सरांनी देशाचे प्रधान मंत्री मा. नरेंद्रजी मोदी साहेबांचे आभार मानले, त्याचबरोबर माझ्या मतदार संघातील असलेल्या माझ्या जिल्ह्यामध्ये ह्या नवीन शैक्षणिक धोरणाची चर्चा सत्राची सुरवात झाल्याबद्दल राज्याचे लाडके मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री मा. देवेन्द्रजी फडणवीस साहेब आणि शिक्षण मंत्री मा. केसरकर साहेब यांचे आभार मानले.
    उपस्थीत शिक्षण विभागाचे आधिकारी कर्मचारी, शिक्षक शिक्षकेतर, पालक आणि शिक्षण संस्थेचे पदाधिकारी यांच्या सोबत संवाद साधताना नवीन शैक्षणिक धोरण असे चांगले आहे आणि त्यापासून होणारे विधार्थ्यांचे फायदे याचे सविस्तर मार्गदर्शन केले आणि आयोजकांना व उपस्थीतांना शुभेच्छा दिल्या.
    Ikspl चे प्रमुख कर्नल नडेला साहेब , नायर साहेब अन्य सदस्य उपस्थित होते , संयोजन टेलेक्सा कंपनी यांनी केले होते.अशी माहिती संपर्क प्रमुख
    विष्णु विषे यांनी आमचे प्रतिनिधी मनिलाल शिंपी यांना दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *