कुसुंबा ग्राम पंचायत कार्यालयात महात्मा ज्योतिराव फुले जयंती साजरी
![]()

कुसुंबा ग्राम पंचायत कार्यालयात महात्मा ज्योतिराव फुले जयंती साजरी
कुसुंबा – क्रांतीसुर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त कुसुंबा ग्राम पंचायत कार्यालयात प्रतिमापुजन करण्यात आले यावेळी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष किरण शिंदे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी प्रा.डॉ. दत्तात्रेय परदेशी यांनी महात्मा फुले यांच्या कार्यालयाला उजाळा दिला.
यावेळी बोलताना डॉ परदेशी म्हणाले की, सत्यशोधक समाजाची स्थापना हे ज्योतिबा फुले यांच्या दूरदर्शी व्यक्तीमत्वाचा एक पैलू समाजात पसरलेल्या जातीभेदाला दूर करण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना करण्यात आली होती.
शेतकऱ्यांचा आसूड’ हा महात्मा फुले यांचा प्रसिद्ध ग्रंथ. तत्कालीन समाजातील जातिभेद अनिष्ट प्रथा, तसेच समाजातील उच्चवर्णीयांची मक्तेदारी याविरुद्धची प्रतिक्रिया महात्मा फुले यांच्या साहित्यातून उमटलेली होती. त्याकाळच्या समाजाला प्रबोधनाची व सामाजिक परिवर्तनाची वाट दाखविण्यासाठी त्यांनी लिहिलेले ग्रंथ हे मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरले. १८८८ साली सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलराव कृष्णाजी वंडेकर यांनी “महात्मा” ही पदवी प्रदान केली. तेव्हापासून ते महात्मा फुले याच नावानं ओळखले जाऊ लागले. तसेच शेतकऱ्यांसाठी पहिली कर्ज माफीची संकल्पना ज्योतीराव फुले यांनी मांडली होती.
यावेळी कुसुंब्यांच्या उपसरपंच स्वातीताई जाधव, सुधाकर जाधव, प्रा. डॉ. दत्ता परदेशी, संजय रायते एन. टी. शिंदे, प्रा. अमोल शिंदे, शरद मानकर, रूपेश नहिरे, अमोल जाधव, तुषार जाधव, उदय जाधव, प्रशांत जिरे, वसंत माळी, राजेंद्र सोनवणे, डिगा परदेशी, मच्छिंद्र गायकवाड, अनिल रायते, विनोद माळी, बबलू माळी, लंकेश माळी, संजय शिंदे, चेतन माळी, पांडू देवरे, गोकुळदास बैरागी, राजेंद्र सोनवणे, भटू पटेल, शरद शिंदे, वाडीले सर, विलास शिंदे, करण पवार, मयूर माळी आदी मान्यवर व समाज बांधव उपस्थित होते.

