महात्मा फुले जयंतीचे औचित्य साधत बोहरे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक गोपाल महाजन पुरस्काराने सन्मानित
![]()


महात्मा फुले जयंतीनिमित्त गोपाल महाजन पुरस्काराने सन्मानित
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीतीचे औचित्य साधत माजी गट शिक्षणाधिकारी शर्मिला चव्हाण व कल्पना वाडीले यांच्या सेवापूर्ती निमित्ताने व पंचायत समिती शिक्षण विभाग अमळनेर यांच्यामार्फत जिल्हा परिषद शाळा बोहराचे उपक्रमशील शिक्षक गोपाल शामराव महाजन यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
बोहरे जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी शिक्षक गोपाल महाजन विविध उपक्रम राबविले. त्यांच्या कार्याची दखल पंचायत समिती शिक्षण विभागाने घेतली..
यावेळी शिक्षक सुशिल भदाने , आनंदा धनगर , भुषण महाले हेमंत महाजन दिपक महाजन , अतूल बोरसे चंद्रकांत देसले विलास पाटील गोपाल महाजन , श्रीमती सविता देशमुख ,श्रीमती सोनाली देशमुख श्रीमती मिनाजी पाटील यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
त्यांना पुरस्कार माजी गट शिक्षणाधिकारी शर्मिला चव्हाण मॅडम,
गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील,विस्ताराधिकारी पी.डी.धनगर
मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, माध्यमिक शिक्षक संघटनेचे संचालक तुषार बोरसे, माध्यमिक शिक्षक संघाचे संजय पाटील,
क्रीडा संघटनेचे सुनील वाघ ,शिक्षक भारतीचे आर.जे पाटील, केंद्रप्रमुख दिलीप सोनवणे, रवींद्र पाटील, अशोक सोनवणे, शरद सोनवणे, ज्ञानेश्वर पाटील, छगन पाटील, वाडीले उपस्थित होते. पुरस्कार्थी बंधू व भगिनींना
मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदर्श शिक्षक दत्तात्रय सोनवणे यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रस्ताविक गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील यांनी केले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पि डी धनगर होते. कार्यक्रमाचे आभार गणित मंडळाचे समन्वयक डी.ए धनगर यांनी मानले.
सर्व पुरस्कार बंधू-भगिनींचे मित्र परिवाराकडून अभिनंदन करण्यात आले.

