देवगांव देवळी हायस्कूलमध्ये
महात्मा फुले जयंती निमित्ताने अभिवादन
![]()






देवगांव देवळी हायस्कूलमध्ये
महात्मा फुले जयंती निमित्ताने अभिवादन
अमळनेर प्रतिनिधी
देवगांव देवळी तालुका अमळनेर येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल मध्ये 11 एप्रिल महात्मा फुले जयंती निमित्ताने महात्मा फुलेंना अभिवादन करण्यात आले.
शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले.
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंती निमित्ताने शाळेत सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी 11 एप्रिल ला महात्मा फुले जयंतीला शासकीय सुट्टी घोषित झाली पाहिजे या मागणीचे बॅनर धरून शासनाकडे मागणी केली आहे. शाळेतील विद्यार्थी व शिक्षक पत्राद्वारे मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री,विरोधीपक्ष नेते व शिक्षण मंत्र्यांकडे मागणी करणार आहेत. यावेळी शाळेचे शिक्षक आय.आर.महाजन, एस.के.महाजन, एच.ओ.माळी,अरविंद सोनटक्के, शिक्षकेत्तर कर्मचारी एन.जी.देशमुख संभाजी पाटील, गुरूदास पाटील उपस्थित होते.

