1 min read

महात्मा फुले यांच्या जीवनातील दोन हृदय द्रावक घटना…

Loading

Must_Read

राष्ट्रपिता महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दीक शुभेच्छा 💐💐💐🌷🌷🌷

संदर्भ- लेखक किसन सूर्यवंशी यांच्या पुस्तकातून -9766250921

महात्मा फुले यांच्या जीवनातील दोन हृदय द्रावक घटना एक वेळ अवश्य वाचा

1 – करोडपती असलेले महात्मा फुले हे 1890 साली मरण पावतात ;
तेव्हा त्यांचे पार्थिव स्मशानभूमीत घेऊन जातात पण त्यांच्या चितेला अग्नी कोणीच देत नाहीत; याचे कारण म्हणजे या महात्मा फुले यांना जो मुलगा आसतो तो दत्तक घेतलेला असतो त्या मुळे समाजातील काही कर्मठ लोक अग्नी देवू देत नव्हते;

यशवंत मुलगा अग्नी देण्यास पुढे जायचा पण पुरोहित व जातभाई लोक यशवंताला मागे ढकलून देत ;
हा खेळ बराच वेळा चालला; महात्मा फुले यांचा पार्थिव पडून आहे ;
तर त्याला शेवटच्या क्षणी देखील धर्मग्रंथ आडवा आला
शेवटी सावित्रीबाई फुले पुढाकार घेऊन प्रेताला अग्नी दिला

विचार करा ,जीवंतपणी महात्मा फुले यांच्या शरीराची विटंबना अपमान बामनांनी केला पण मेल्यावरही जातीतील लोकंच विटंबना करतात ? यावर फुले अनुयायी विचार करतील?

2 – दुसरी एक घटना अशी की महात्मा फुले यांची सून म्हनजे यशवंताची पत्नी पुण्यात राहत होती ;
अतिशय गरीब अवस्थेत ,खायला अन्न नाही, राहायला घर नाही ;
अशाच वेळेस एक दिवस असा आला घरातील सर्व अन्न संपले ,घरात कपाळावर लावायला एक रुपया नाही;

अशा वेळी त्या माऊलीने आपले घर शंभर रुपयात विकून टाकले व महात्मा फुले यांनी लिहिलेले पुस्तके रद्दीत विकून दिवसाची गुजराण केली व दुसऱ्या दिवशी सकाळी मरण पावली;

तर मग तीचे प्रेत तसेच पडून आहे;
पण दफन करायला पुढे कोणीही आले नाही ;
दिवसभर ते प्रेत सडत आहे ,त्याचा वास येतोय; जातीचे लोक कोणीच तिकडे गेले नाही;
शेवटी पुणे महानगर पालिका ने ते प्रेत बेवारस म्हनून जाहीर केले व अंत्यसंसकार केला .

विचार करा त्या काळात या महात्मा फुले यांच्या वडीलांचे मासिक उत्पन्न बारा लाख रुपये होते;

तर रतन टाटा यांच्या उत्पन्न फक्त वीस हजार रुपये होते म्हनजे महात्मा फुले यांच्याकडे दोनशे एकर शेती होती व काही प्रमाणात फुलझाडे लावत; संदर्भ (हरी नरके लिखित पुस्तक )

विचार करा ,आम्ही शिकून साहेब बनावे यासाठी महात्मा फुले यांनी
जीवनाची माती केली ,म्हणून आमच्या जीवनाचे हिरे मोती झाले ,पण त्यांचा शेवट हा पशु प्रमाणे व्हावा ही बहुजनांना साठी शरमेची गोष्ट आहे;

जगाच्या पाठीवर फुले हालहाल होवून मेले मग आम्ही घरात त्यांचा फोटोदेखील लावत नसू तर हा किती कृतघ्नपणा करत आहोत ??याचा विचार केला पाहिजे;

आजचा शिकून सुशिक्षित बनलेला बहुजन समाज ऐश आरामीच्या थंडगार सावलीखाली तो शांत झोपी गेलेला आहे ,लोकांच्या जाणिवा बोथट झालेले आहेत, त्यांच्या अस्मितेचा झरा कधीचा आटून गेलेला आहे , यांचा विवेक हा जातीच्या अहंकारामध्ये गंजत पडलेला आहे.

एकदा सावित्रीबाई फुले आपल्या पतीला म्हणाल्या की, आपण मेल्यावरही बहुजन समाजाचे कसे होईल? ही चळवळ पुढे कोण चालवणार? तेव्हा महात्मा फुले उत्तर देताना

सांगितले की”” माझ्या शरीरात असलेल्या प्रत्येक रक्ताच्या थेंबातून बहुजनाच्या घरात महात्मा फुले जन्म घेतील “”

विचार करा महात्मा फुले यानी बहुजनावर किती विश्वास ठेवला ?
मग सांगा आतापर्यंत किती फुले जन्मले? एकही नाही .

मग महात्मा फुले चुकीचे बोलले की त्यांचे अनुयायी चुकीचे वागले ??याचा विचार केला पाहिजे

जर उदयोगपती असलेले हे महात्मा फुले यांनी समाजाचा विचार केला नसता तर त्यांचे वारस जीवंत राहिले असते व

आजचे रतन टाटा ;बिर्ला; अंबानी ;सचिन तेंडुलकर व अमिताभ बच्चन या साऱ्या श्रीमंत लोकांना महात्मा फुले यांच्या वारसदाराने विकत घेऊन घरी पाणी भरायला लावले असते एवढे गर्भश्रीमंत राहीले असते

जय ज्योती! जय भीम!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *