1 min read

जळगाव जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघाचे २०२३ चे क्रीडा जीवन गौरव व आदर्श क्रीडाशिक्षक पुरस्कार वितरण उत्साहात संपन्न :-

Loading

जळगाव जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघाचे २०२३ चे क्रीडा जीवन गौरव व आदर्श क्रीडाशिक्षक पुरस्कार वितरण उत्साहात संपन्न :-

जळगांव प्रतिनिधी
जळगाव जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघ आयोजित क्रीडा जीवन गौरव पुरस्कार व जिल्हास्तरीय आदर्श क्रीडाशिक्षक पुरस्कार वितरण सोहळा आज शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय सभागृहात संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ साहित्यिक कवी डॉ मिलींद बागुल तर प्रमुख अतिथी म्हणून जळगाव महानगरपालिकेचे सहायक आयुक्त तथा ग.स. सोसायटीचे अध्यक्ष श्री उदय पाटील, महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशनचे उपाध्यक्ष शिवछत्रपती पुरस्कार्थी डॉ नारायण खडके, माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी श्री ई. आर.शेख, राष्ट्रीय कबड्डी खेळाडू तथा नगरसेवक श्री नितिन बरडे, रोटरी क्लबचे अध्यक्ष रो.राजेश वेद, मनपा क्रीडा अधिकारी श्री दीनानाथ भामरे, क्रीडा अधिकारी श्री एम.के.पाटील, जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष डॉ पी आर चौधरी, ग.स.सोसायटीचे संचालक श्री अजय देशमुख, खो-खो चे राज्य क्रीडा मार्गदर्शक श्री मिनल थोरात, जिल्हा क्रीडाशिक्षक महासंघाचे अध्यक्ष शिवछत्रपती पुरस्कार्थी डॉ प्रदीप तळवलकर, कार्याध्यक्ष श्री प्रशांत कोल्हे यांची उपस्थिती होती प्रारंभी मान्यवरांनी श्री साईबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन माल्यार्पण व दीपप्रज्वलन केले प्रा प्रशांत सोनवणे यांनी स्वागतगीत व महाराष्ट्र गीत सादर केले त्यांना रुपेश ठाकूर व प्रणव गडे यांनी वाद्यवृंदाची साथ दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा क्रीडाशिक्षक महासंघाचे सचिव राजेश जाधव यांनी तर आभार प्रदर्शन कार्याध्यक्ष प्रशांत कोल्हे यांनी केले याप्रसंगी डॉ विलास नारखेडे यांना सावित्रीमाई फुले राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री प्रविण पाटील यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल तर श्री अनिल माकडे यांची राज्य आट्यापाट्या महामंडळाच्या संचालक पदी नियुक्ती झाल्याबद्दल सन्मानपत्र देऊन विशेष सत्कार करण्यात आला जिल्हा आदर्श क्रीडाशिक्षक पुरस्कार्थी याप्रमाणे :
क्रीडा जीवन गौरव पुरस्कार प्रा.ईकबालबेग उस्मानबेग मिर्झा यांना तर जिल्हास्तरीय आदर्श क्रीडाशिक्षक पुरस्कार सर्वश्री हरी गंगाराम काळे (का.ऊ.कोल्हे विद्यालय). मुख्याध्यापक सुरेश शंकर बारी (बारी समाज माध्यमिक विद्यालय शिरसोली).आशिषकुमार प्रभाकर चौधरी (महात्मा गांधी विद्यालय,वरणगाव). दिलीप बिहारी संगेले (निवासी इंग्लिश स्कुल किनगाव रोड यावल). मुख्याध्यापक एकनाथ जगन्नाथ महाजन (सरदार जी जी हायस्कुल रावेर). गणेश रमेश बोदडे (स्व. निखीलभाऊ खडसे विद्यालय मुक्ताईनगर). गिरीष चंद्रराव पाटील (इंदिराबाई ललवाणी विद्यालय). सुनिल कृष्णराव पाटील (माध्यमिक विद्यालय खाजोळा). नितीन काशिनाथ सोनजे (सुमनताई गिरधर पाटील विद्यालय भडगाव). सचिन रमेश महाजन (रे.ना.पाटील विद्यालय रिंगणगाव). योगेश रामराव साळुंखे (गिरणा माध्यमिक विद्यालय मेहुनबारे). रोहिणी गोविंदा जाधव (राणी लक्ष्मीबाई ज्युनियर कॉलेज पारोळा).निवृत्ती लक्ष्मण पाटील (सरस्वती माध्यमिक विद्यालय सडावण).मनोज दरियावसिंग परदेशी (पी आर हायस्कुल धरणगाव). जितेंद्र विजय महाजन (भाऊसो. शा. शि.पाटील विद्यालय चहार्डी).
मेघशाम बळीराम शिंदे ( सेंट अलॉयसिस हायस्कुल भुसावळ).
छाया संदेशकुमार बोरसे (पोद्दार इंटरनॅशनल स्कुल जळगाव ).1
विजय प्रभाकर विसपुते (उज्वल स्पराऊटर्स).प्रा खुशाल भिकनराव देशमुख ( के आर कोतकर ज्युनियर कॉलेज चाळीसगाव). यांना देण्यात आले.
पुरस्कार्थीनां जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनतर्फे ॲथलेटिक्स खेळाच्या नियमावलीचे, जळगाव जिल्हा डॉजबॉल असोसिएशनतर्फे डॉजबॉल खेळाच्या नियमावलीचे तर आमदार श्री राजुमामा भोळे यांच्यातर्फे बहिणाबाईच्या कथा व गाणी ही पुस्तके भेट देण्यात आली कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा युवा क्रीडाशिक्षक महासंघाचे अध्यक्ष डॉ रणजित पाटील, सचिव प्रा हरिश शेळके, निलेश पाटील, गिरीश महाजन, नितीन पाटील, प्रा समीर घोडेस्वार, देविदास महाजन, जितेंद्र फिरके, सुनील वाघ, संदीप पवार, प्रेमचंद चौधरी, सचिन सुर्यवंशी, सिद्धी महाजन, मनोज वाघ यांचे मोलाचे सहकार्य लाभले. पुरस्कार्थीच्या वतीने श्री हरी काळे यांनी मनोगत व्यक्त केले राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली कार्यक्रमास पुरस्कार्थी यांचे कुटूंबीय तथा जिल्हा क्रीडाशिक्षक महासंघाचे पदाधिकारी व सदस्य यांची उपस्थिती होती.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

राजेश जाधव : सचिव, जळगाव जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघ.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *