तीन वर्ष असाह्य वेदनांनी तरुणी बेजार, आईच्या मदतीने गुन्हा दाखल,बोईसरच्या नराधमाचा तरुणीवर अमानुष अन् अनैसर्गिक अत्याचार,
![]()
बोईसरच्या नराधमाचा तरुणीवर अमानुष अन् अनैसर्गिक अत्याचार
तीन वर्ष असाह्य वेदनांनी तरुणी बेजार, आईच्या मदतीने गुन्हा दाखल
शिरपूर पोलिसांनी नराधमाच्या बोईसरहून आवळल्या मुसक्या

मुंबई,बोईसर (मनिलाल शिंपी):शितपेयात गुंगीचे औषध देऊन बोईसर येथील नराधम तरुणाने २१ वर्षीय तरुणीला मारहाण करीत अमानुष आणि अनैसर्गिकरित्या बलात्कारीत तिचे विवस्त्र फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याची घटना घडली. सलग तीन वर्ष त्याचा अमानुष अत्याचार असाह्य झाल्याने अखेर त्याला धडा शिकवण्यासाठी फिर्याद दिल्याने शिरपूर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, बोईसर येथील भूषण वसंत करणकाळे याने २०१९ मध्ये चोपडा तालुक्यातील एका २१ वर्षीय तरुणीशी मैत्री करत तिला शिरपूर येथील हॉटेलवर नेत शीतपेयात गुंगीचे औषध देत तिच्या अंगाला स्पर्श करू लागला. तरुणीने त्याला विरोध केला असता तिला मारहाण करत तिच्यावर अत्याचार केला. आणि तिचे विवस्त्र आणि बिभित्स अवस्थेत फोटो काढत तिला वेळीवेळी ब्लॅकमेल करत तिच्या इच्छेविरुद्ध अनैसर्गिक रित्या तिच्यावर अत्याचार करीत होता.
कधी धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील हॉटेलमध्ये तर कधी मुंबई येथे बोलावत तिच्यावर अत्याचार करीत होता. तरुणीने त्याला विरोध केला तर तिला मारहाण करीत तिच्या आई आणि भावाला मारण्याची धमकी देत अत्याचार करायचा. पीडित तरुणी २०१९ पासून हा त्रास सहन करीत असल्याने अखेर हा त्रास असह्य झाला होता. तरुणीला वडील नसल्याने तिने आईला सर्व घडलेला प्रकार सांगितला. त्यामुळे तिच्या आईच्या पायाखालची जमीनच सरकली. नंतर स्वतःला सावरत या नराधमाला धडा शिकवण्यासाठी तरुणीच्या आईने सरळ शिरपूर पोलीस ठाणे गाठत २७ मार्च रोजी भूषण वसंत करणकाळे वय ( वर्ष २७) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार भारतीय दंड संहिता ३७६, ३७६ (२), ३७७,३२३,५०४,५०६ कलमानुसार शिरपूर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बोईसर येथून आवळल्या मुसक्या
शिरपूर पोलिसांनी आरोपी भूषण वसंत करणकाळे याला रविवारी बोईसर येथील यशवंत सृष्टी येथून ताब्यात घेतले आहे. सोमवारी त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
विकृत अन् लिंगपिसाटचा कळस
मिळालेल्या माहितीनुसार आरोपी भूषण वसंत करणकाळे हा विकृत स्वभावाचा आणि लिंगपिसाट आहे. त्याच्यावर या अगोदर देखील बोईसर पोलीस ठाण्यात विनयभंग सारखा गंभीर गुन्हा दाखल झाला होता. त्यावेळेस हा बोईसर येथून सहा महिने फरार झाला होता. सदर विनयभंग केल्याप्रकरणी समोरच्या महिलेवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवत विनयभंगाची तक्रार मागे घ्यायला लावत त्याच्या बाजूलाच राहत असलेल्या महिलेवर दबाव टाकत तक्रार मागे घ्यायला भाग पाडले. त्यामुळे कायद्याने त्याला ठेचून काढण्यासाठी पोलिसांनी सखोल तपास करावा, अशी पिडिताकडून मागणी होत आहे.
लिंगपिसाट भूषणला चढलाय बापाच्या पैशांचा माज
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी भूषण वसंत करणकाळे याचे वडील बोईसर एमआयडीसी मध्ये कंत्राटदार असून महिन्याला चार ते पाच लाख रुपये कमवीत असतात. आणि आरोपीचे काका अशोक करणकाळे हे आरती ड्रग्समध्ये प्यून असून पगार मात्र २५ हजार आहे. परंतु कंपनीत काळाबाजार करीत कारोडोची मालमत्ता जमवली आहे. याच पैशांचा बळावर बोईसर पोलिस ठाण्यातील विनयभंग सारखा गंभीर गुन्हा दाखल होऊ दिला नसल्याचे स्वतः आरोपी भूषण वसंत करणकाळे हा बोलत असतो. आमच्याकडे भरपूर पैसा आहे कोणताही गुन्हा दाखल झाला तरी मला काहीही होणार नाही असा दम देखील तरुणीला तो देत असल्याचे समजते.


बापाच्याही शंभर लफडी असल्याच फालतू अभिमान
मीच काय माझ्या वडिलांचे देखील शंभर लफडी आहेत. मला कोण काय करेल असा फालतू विश्वास आरोपीला आहे, असे सांगून तो निर्लजतेचा कळस गाठतो. त्यामुळे पोलिसांनी त्याची चांगली हजेरी घेणे आवश्यक आहे. त्याला मोकळे सोडले तर हा माजलेला लिंगपिसाट अजून किती तरुणींचे आयुष्य बरबाद करेल, हे सांगता येत नाही, त्यामुळे त्याच्या नांग्या आताच ठेचल्यातर अनेक निष्पाप मुलींचे आयुष्य वाचेल, असे पिडीत तरुण स्वअनुभवाने सांगते.

