1 min read

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीचा आदेश निर्गमित
अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या आंदोलनाला यश

Loading

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीचा आदेश निर्गमित
अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या आंदोलनाला यश

राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना समान किमान कार्यक्रमात जाहीर केल्याप्रमाणे भरीव मानधनवाढ करावी यासह अन्य मागण्यांसाठी संघटनेच्या वतीने रायगडासह आझाद मैदान मुंबई येथे मायाताई परमेश्वर, रामकृष्ण बी. पाटील आणि युवराज बैसाणे यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने आंदोलने केली.
आंदोलनाच्या रेट्यामुळे अर्थ संकल्पीय अधिवेशनातही सुमारे शंभर आमदारांनी मानधनवाढीचा मुद्दा उपस्थित करत सभात्यागही केला.याची दखल घेत राज्य शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला होता.
त्या अनुषंगाने शासनाने दि. ३ एप्रिल रोजी महीला व बालविकास विभागाचे उपसचिव श्री.विलास ठाकूर यांच्या सहीने आदेश(जीआर) काढला असून सदर आदेशानुसार अंगणवाडी सेविका १० हजार, मिनी अंगणवाडी सेविका सात हजार दोनशे आणि मदतनीस पाच हजार पाचशे रुपये इतके करून सेवाजेष्ठतेप्रमाणे मानधन केले असल्याचे नमूद केले असून सदर वाढ दि. १ एप्रिल २०२३ पासून लागू केली आहे.
या मानधनवाढीचा जळगाव जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांसह राज्यातील सुमारे दोन लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.अशी माहिती संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *