1 min read

भडने येथे प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेअंतर्गत महिलांना मोफत गॅस वाटप

Loading

भडने येथे प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेअंतर्गत महिलांना मोफत गॅस वाटप

शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथे केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना अंतर्गत धुर मुक्त चुलमुक्त या उद्देशाने गावातील घरजु लाभार्थी महिलांना लामकानी येथील हरी ओम भारत गॅस एजन्सी व भडणे ग्रामपंचायत तर्फे गावातील 40 महिलांना मोफत गॅस वाटप करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भडणे येथील लोक नियुक्त सरपंच गिरीश वामनराव पाटील उपसरपंच भाऊसाहेब राजाराम निकम भडणे येथील आदर्श पुरस्कार प्राप्त पोलीस पाटील युवराज मोहन माळी यांच्या उपस्थितीत भडने येथील ल भगवा चौकात दिनांक सात एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता गावातील मान्यवरांच्या उपस्थितीत गावातील महिलांना गॅस वाटप करण्यात आले यावेळी गावातील एकूण 40 महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याने समाधान व्यक्त केले यावेळी गावातील माजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ सामाजिक कार्यकर्ते व प्रगतशील मान्यवरांच्या उपस्थित महिला वर्गांना गॅस वितरित करण्यात आला कार्यक्रम संपन्न झाला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *