1 min read

अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाला ‘स्वर्गीय वसंतराव काणे’ आदर्श पुरस्काराने सन्मानित….

Loading

अमळनेर पत्रकार संघाला स्वर्गीय वसंतराव काणे आदर्श पुरस्काराने सन्मानित….

अमळनेर प्रतिनिधी
मराठी पत्रकार परिषद मुंबई च्या वतीने स्वर्गीय वसंतराव काणे आदर्श पत्रकार तालुका पत्रकार संघ पुरस्कार अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघास प्राप्त झाल्याने सदर पुरस्कार खासदार तथा सामनाचे संपादक संजयजी राऊत यांच्या हस्ते तथा आमदार रोहितदादा पवार व मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त मा.एस एम देशमुख यांच्या उपस्थितीत स्वीकारताना अमळनेर पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपुत,उपाध्यक्ष जितेंद्र ठाकूर तसेच सोबत जेष्ठ पत्रकार संजय पाटील,किरण पाटील,महेंद्र रामोशे,आर जे पाटील,अमोल पाटील,युवराज पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.
संपूर्ण नाशिक विभागातून एकमेव अमळनेर तालुक्यास हा पुरस्कार प्राप्त झाल्याने सर्व पत्रकारिता, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, धार्मिक,क्रीडा क्षेत्रातील पदाधिकारी यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

पुरस्कार स्वीकारताना पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत व पदाधिकारी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *