1 min read

कॉ.पी.बी.कडू.पाटील फौंडेशनला मंगेश वडजे यांचेकडुन देणगी प्रदान

Loading

कॉ.पी.बी.कडू.पाटील फौंडेशनला मंगेश वडजे यांचेकडुन देणगी प्रदान

काँ.पी.बी.कडू.पाटील फौंडेशनसाठी मंगेश वडजे यांचेकडून दोन लाखांचा धनादेश स्विकारताना फौंडेशनचे अध्यक्ष मा.अरुण कडू पाटील,आदि मान्यवर( छायाचित्र-बाबासाहेब सुर्यवंशी)

सात्रळ / प्रतिनिधी
बाबासाहेब वाघचौरे
राहुरी तालुक्यातील सात्रळ येथील याप्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील व सात्रळचे भूमीपुत्र कॉ.पी.बी.कडू पाटील यांच्या प्रतिमेस उपस्थित मान्यवरांनी विनम्र अभिवादन करून पुष्पांजली अर्पण केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्याचा परिचय रयत सेवक संघाचे माजी सरचिटणीस भाऊसाहेब पेटकर यांनी केले.
याप्रसंगी मुंबई येथील हायबर टेक्नोक्रैट प्रायव्हेट लिमिटेड या सॉफ्टवेअर कंपनीचे अध्यक्ष व कार्याकारी संचालक तसेच थोर देणगीदार मंगेश वडजे यांनी रयत शिक्षण संस्थेचे,उपाध्यक्ष व कॉ.पी.बी.कडू.पाटील फौंडेशनचे अध्यक्ष अरुण कडू पाटील यांना दोन लाख देणगी फौंडेशनसाठी प्रदान केली.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजीराव भोर,वडजे बापू, त्रिंबकराव गायकवाड,सौ.शोभाताई वडजे, आदित्य वडजे, प्रगती पतसंस्थेचे चेअरमन ॲड विजयराव कडू पाटील,माजी विभागीय अधिकारी अण्णासाहेब साबळे,चार्लस खंडागळे,बी.वाय शिरसाठ,बबनराव कडू,गोरक्षनाथ बनकर युवानेते किरण कडू,पंकज कडू, विक्रांत कडू, भास्कर राव फणसे, पत्रकार किशोर भांड,अनिल वाकचौरे, संभाजीराव कडू, माजी पर्यवेक्षक बी.बी.गोसावी,प्राचार्य किशोर ससाणे,कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ अनिता निबे पर्यवेक्षिका सुशिला थोरात आदि मान्यवर तसेच शिक्षणप्रेमी,ग्रामस्थ व संकुलातील सर्व सेवकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
थोर देणगीदार मंगेश वडजे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन करताना म्हणाले की, विद्यार्थी मित्रांनो आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो.यासाठी आपण खूप शिकून मोठे बना.आणि गोर गरीबांना मदतीचा आधार बना असे प्रतिपादन वडजे यांनी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी असलेले रयत शिक्षण संस्थेचे,माजी सचिव शिवाजीराव भोर यांनी अध्यक्षीय मनोगतातून थोर देणगीदार मंगेश वडजे यांच्या जीवनाचा आढावा विद्यार्थ्यांसमोर मांडत म्हणाले की, विद्यार्थी मित्रांनो आपणही मंगेश वडजे साहेबांसारखे मोठे होऊन समाजाचे काहीतरी देणे व्हा..कारण आंबे वरखेडाचे भूमीपुत्र वडजे कुटुंब हे समाजासाठी खरोखर आदर्श आहे.कारण या कुंटुंबाने गोरगरीबांची मुले चांगल्याप्रकारे शिकले पाहिजे,म्हणून वडजे कुटुंबांने अनेक देणग्या अनेक शाळेंना प्रदान केल्या आहे.. असे विचार भोर यांनी मांडले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास गभाले यांनी केले तर थोर देणगीदारांचे व उपस्थित मान्यवरांचे आभार फौंडेशनचे अध्यक्ष अरुण कडू पाटील यांनी मानले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *