1 min read

आपण शिकलो नसलो तरी आपल्या मुलांना उच्च शिक्षण द्या – निलेश चौधरी
लवलेश सुतार व निलम तिवारी यांच्या स्तुत्य उपक्रमामुळे नारी शक्तीचा सन्मान करण्याचे भाग्य मिळाले- डॉ. किशोर पाटील

Loading

आपण शिकलो नसलो तरी आपल्या मुलांना उच्च शिक्षण द्या – निलेश चौधरी
लवलेश सुतार व निलम तिवारी यांच्या स्तुत्य उपक्रमामुळे नारी शक्तीचा सन्मान करण्याचे भाग्य मिळाले- डॉ. किशोर पाटील

ठाणे,भिवंडी(प्रतिनिधी) भिवंडी शहरातील सत्य वार्ता टीव्ही न्यूज व साप्ताहिक विश्व का सामना यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील श्रीराम नवमी जयंती निमित्ताने आपल्या कामतघर परिसरातील १० बचत गटातील महिलांचा सन्मान सोहळा त्याचबरोबर विविध मान्यवरांचा गुणगौरव कार्यक्रम मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणात ब्रह्मानंद नगर कामतघर भिवंडी येथे नुकताच संपन्न झाला. याच कार्यक्रमाचे औचित्य साधून कुमार युवराज यशवंत सोरे व कुमारी निकिता किशोर अढळकर यांचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला,त्याचप्रमाणे आर.एम.फिल्म प्रोडक्शन यांच्या वतीने गीत संगीतांचा रंगारंग कार्यक्रम मोठ्या जल्लोषात पार पडला . यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा ठाणे जिल्हा व्यापारी आघाडी अध्यक्ष डॉ.श्री.यशवंत महादू सोरे, ज्येष्ठ नगरसेवक श्री.निलेश हरिचंद्र चौधरी, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कोकण विभागीय सचिव तथा दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ.श्री. किशोर बळीराम पाटील ,महाराष्ट्र राज्य मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख,आर एस पी कमांडर डॉ.श्री. मनिलाल रतिलाल शिंपी, श्रीमती सत्वशीला जाधव (उपाध्यक्ष भाजपा),श्रीमती सुधा शंकर चक्रवर्ती संपादिका साप्ताहिक आज का सिद्धांत, शिवसेना नेते श्री.दीपक बजागे, श्री. किशोर अढळकर (नॅशनल मोटिवेटर स्पीकर डोंबिवली) साप्ताहिक सुरज- लोक चे संपादक आचार्य सुरज पाल यादव ,सौ.मीनाक्षी किशोर अढळकर (समाजसेविका डोंबिवली) श्री.मिथिलेश ठाकूर,श्री.विनोद कुमार मोर्या, श्री.नरेश दायमा व आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम मी लवलेश सुतार व निलम तिवारी यांचे अभिनंदन करतो कारण गेल्या अनेक वर्षापासून ब्रह्मानंद नगरमध्ये त्यांच्या चॅनलच्या माध्यमातून ते सामाजिक कार्य करत आहेत, पत्रकारिता करत असताना देखील ते समाजसेवेच्या भावनेतून काम करताना मी पाहत आहे, आज या ठिकाणी आमचे नेते भाजपा जिल्हा व्यापारी आघाडी अध्यक्ष डॉ.श्री.यशवंत महादू सोरे, यांचे सुपुत्र कुमार युवराज यांचा वाढदिवस साजरा केला त्याचप्रमाणे कुमारी निकिता अढळकर हीचा ही वाढदिवस साजरा केला, मी व्यासपीठावर असताना कुमार युवराज याला विचारले की, पुढे तू काय करणार आहेस त्यांनी मला सांगितले मला आय एस बनायचे आहे, मला आनंद वाटला म्हणून मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की आपण जरी शिकलो नाही तरी आपल्या मुलांना आपण आता शिकऊ शकतो, त्यांना उच्च शिक्षण देऊ शकतो असे यावेळी ज्येष्ठ नगरसेवक निलेश चौधरी यांनी सांगितले. श्रीराम नवमी चा कार्यक्रमाचे औचित्य साधून मनिलाल शिंपी यांनी प्रभू श्रीराम सीता यांच्यावर आधारित गुजराथी गितांने सर्वांचे मनोरंजन केले. रामजन्म उत्सव निमित्ताने सत्य वार्ता टीव्ही न्यूज चे संपादक लवलेश सुतार व विश्व का सामनाच्या संपादिका निलम तिवारी यांनी सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील सन्मान नारीचा हा कार्यक्रम आयोजित करून कामतघर परिसरातील दहा बचत गटांच्या महिलांचा सन्मान आज या ठिकाणी करण्याचे भाग्य मला मिळाले त्यामुळे मी आयोजकांचे मनापासून आभार मानतो, तसेच कुमार युवराज व कुमारी निकिता या दोघांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा देऊन त्यांना निरोगी आयुष्य लाभावे व शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी चांगली प्रगती करावी अशी अशा व्यक्त करतो असे यावेळी दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ.श्री.किशोर बळीराम पाटील यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन आचार्य सुरजपाल यादव यांनी केले तर सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सत्यवार्ता टीव्ही न्यूज व साप्ताहिक विश्व का सामना च्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *