शहराची शांतता अबाधित राहील यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा
सहाय्यक पोलीस अधीक्षक
कृषकेश रावले,
अमळनेरला शांतता कमीटीची बैठक संपन्न
![]()

शहराची शांतता अबाधित राहील यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा
सहाय्यक पोलीस अधीक्षक
कृषकेश रावले
अमळनेरला शांतता कमीटीची बैठक संपन्न
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
शहराला मोठे करण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी व नागरीकांची मेहनत असते व ती टिकवणे सर्वाची जबाबदारी आहे, पोलिस कर्मचारी सर्व धर्माचा सण साजरा करतात व शांतता प्रस्थापित करतात तरीपण शहरात वाईट घटना काही तरूण वर्गाची माथी भळकवत होतात अशावर कठोर कारवाई केली जाईल असे सांगत
हिंदी मुस्लिम मधील मैत्री जपा,सर्व समाजातील मुलांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी लिडरशिप करावी.तरूण मुलांनी आपले भविष्य घराब करू नये आपल्याकडून उल्लळबाजी होणार नाही व आई वडीलांचे नाव खराब होणार नाही याची काळजी घ्यावी.एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा घटनेबद्दल कुणाला प्रतिक्रिया देऊ नका कायदा हातात घेऊ नका असे सहाय्यक पोलीस अधीक्षक त्यांनी अमळनेरला डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक जवळ शांतता कमीटेच्या बैठकीत मार्गदर्शन करतांना सांगितले.
शांतता कमीटेच्या बैठकीत सर्व पक्षाचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी यांनी आपल्या मनोगत सांगितले की अमळनेर हे शांतता सुव्यवस्था राखण्यात आघाडीवर असते पण काही समाजकंटकाच्या माध्यमातून शहराच्या अशांतता पसरवण्याचा प्रयत्न केला जातो अशावर पोलिसांनी कठोर कारवाई करावी असे सांगत व चांगल्या व्यक्तींवर जर अनावधानाने गुन्हे दाखल झाले असतील त्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा व पोलिसांच्या उत्कृष्ट कार्याचेपण त्यांनी अभिनंदन केले.
अँड शकील म्हणाले की
क्षुल्लक कारणास्तव अमळनेरची शांतता भंग होत आहे, लोकप्रतिनिधी यांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी सहकार्य करणे गरजेचे आहे. पण कुठे दिसत नाहीत… प्रत्येक प्रभागात नागरीकांनी सिसीटिव्ह स्वखर्चाने बसवावे,आपल्या मूलांना चांगले संस्कार देणे गरजेचे आहे व धर्माच्या नावावर कुणी दिशाभूल करीत असेल त्यांना चांगले वाईटची समज द्यावी असे त्यांनी सांगितले.
मनोज पाटील मा.नगरसेवक शहराध्यक्ष काग्रेस यांनी सांगितले की
गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस अधिकारी यांचे कार्य उल्लेखनीय आहे. शांतता भंग होणार नाही यांची प्रत्येकाची जबाबदारी आहे.
राजकीय लोक स्वार्थासाठी पोळी शकत असतील तर तरणांनी भुलथाफाना बळी पडू नका,प्रत्येक धर्माचा सण शांततेत साजरा झाला पाहिजे असे सांगितले.
आरीफभाया शिरीष चौधरी मित्र परिवार यांनी सांगितले कि शांतता सुव्यवस्था प्रस्थापित करणे पोलीसांचे नव्हे तर प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे असे सांगितले.
तर रियाझ मौलाना म्हणाले की
आईवडील यांच्या विचारावर चला, आजची पिढी सोशल मिडीयावर असते त्यांच्यावर लक्ष देणे गरजेचे आहे , सध्याची तरुण पिढी शिक्षणाकडे लक्ष न देता बराच वेळ सोशल मीडियाच्या माध्यमातून वाईट मार्गाला लागलेली आहे आणि त्यातूनच अशा प्रकारे दोन धर्मात तेढ निर्माण करण्याचे काम होते असे सांगितले
अमळनेरचे कर्तबगार पोलीस निरीक्षक
विजय शिंदे म्हणाले की
पोलीस कर्मचारी सर्व सण विसरतात,कुटुंबाला बोलायला त्यांना वेळ नाही,आपली सेवा प्रामाणिकपणे करीत असतांना काही समाजकंटक दोन धर्मात वातावरण बिघडविण्याचे काम करतात व शहरात अशांतता पसरविण्याचे काम करतात अशावर कठोर कारवाई केली जाईल व
शहरात शांतता सुव्यवस्था राखण्यासाठी,शांतता कमीटीची सभा बोलवावी लागते याची खंत वाटते.शहरात सगळयाचे सण असतात पण असे दृश्य का दिसते?दवाखान्यात धर्म नसतो मग आपण धर्माचा नावाने भांडण का करतो अशी खंत व्यक्त त्यांनी केली. मदत करत असतांना जातपात नसते ,तरूणांना कोण वाईट विचार पेरतं,माथी भडकावू नका,अणूबाँममूळे देश उध्वस्त होत नाही तर माणसाच्या मेंदूमूळे होतो.
एमडीए करून सन्मान मिळेल पण आम्हाला समाधान मिळणार नाही पण जनता कायदा राबविणा-याला घाबरवते,कायदयाला तो घाबरत नाही.अमळनेर ची शांतता भंग करणा-याला माफी नाही असेही त्यांनी सांगितले.
शांतता कमेटीच्या बैठकीत सुत्रसंचालन पत्रकार डिगंबर महाले यांनी केले तर आभार डॉ शरद पाटील यांनी मानले.यावेळी पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे सह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.






