1 min read

देशात भाजपचे सुडाचे राजकारण
अँड संदीप पाटील
मा.जिल्हा अध्यक्ष काग्रेंस याचा पत्रकार परिषदेत आरोप..

Loading

देशात भाजपचे सुडाचे राजकारण
अँड संदीप पाटील
मा.जिल्हा अध्यक्ष काग्रेस

अमळनेर प्रतिनिधी -अदानी मोदीचे संबंध काय आहेत यावर राहुलजींनी प्रश्न विचारला असता त्यांना संसदेत बोलू दिले जात नाही. संसदेत हुकूमशाही पद्धतीने कारभार सुरु आहे.
राहुल गांधींना दोन वर्षांपूर्वी वादग्रस्त विधान कर्नाटकमध्ये केले होते. त्याचा गुन्हा कर्नाटकमध्ये न करता गुजरात राज्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला. गजरात कोर्टाने राहुल गांधींना दोन वर्षाची शिक्षा दिली व दुसऱ्याच दिवशी त्यांना आपले म्हणणे न मांडू देता त्यांची खासदारकी रद्द केली. तेवढ्यावर भाजप थांबले नाही पुढे त्यांना अपील करण्यास संधी दिली नाही व त्यांचा बंगला सोडण्यासाठी सुद्धा नोटीस दिली अशा प्रकारचे सूड भावनेचे राजकारण भाजप सरकार करत आहे .त्यामुळे देशातील लोकशाही धोक्यात येत आहे असे अमळनेर येथे जय योगेश्वर महाविद्यालयात आयोजित कांग्रेस पक्षाच्या पत्रकार परिषदमध्ये काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष संदीप भैय्या पाटील बोलत होते.
ते पुढे म्हणाले की अदानी जगात तात्काळ दोन नंबरचे श्रीमंत कसे झाले? अनेक श्रीमंतांना त्यांनी मागे कसे टाकले. यामध्ये भारतीयांचेशेअर्स मध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मोदी सरकारने याबाबत मध्ये मौन व्रत का घेतले आहे .अगोदर देशाचे पंतप्रधान राजीव गांधी व भाजपचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे संबंध कसे होते. अगोदर एखादा पक्ष सत्तेत असला व दुसरा पक्ष विरोधात असला कधीही सुडाचे,द्वेषाचे राजकारण नव्हते. पण सध्या भाजपचे संपूर्ण देशामध्ये सुडाचे चे राजकारण सुरू आहे. ईडी,सीबीआयचा धाक दाखवून विरोधी पक्षांचे राजकारण संपवण्याचा कुटिल डाव सध्या सुरू आहे. राहुल गांधींनी संपूर्ण देशात भारत जोडो यात्रा काढल्यामुळे तिला मोठ्या प्रमाणावर देशात प्रतिसाद मिळाला. यामुळे सत्ताधारी पक्षाला भविष्यात जड पडेल यामुळे विरोधी पक्षांचे राजकारण संपवण्याचा सध्या कुटील डाव सुरू आहे. पंडित नेहरूंनी ओबीसी आयोगाची स्थापना केली. ओबीसी समाजाला उच्च शिक्षणात सत्तावीस टक्के आरक्षण दिले. आणि ओबीसी समाजाचा अपमान काँग्रेसने केला असा चुकीचा प्रचार भाजप करीत आहे पण याबाबत जनता सर्व ओळखून आहे. काँग्रेस पक्षाने नेहमीच ओबीसी समाजाला न्याय दिलेला आहे तेवढेच सत्य आहे. काँग्रेसची संपूर्ण देशात ‘हात जोडो’ आंदोलन सुरू आहे. व संपूर्ण राज्यात जिल्ह्यात तालुक्यात पत्रकार परिषद आयोजित करून भाजपचा खरा चेहरा लोकांसमोर आणण्याचे काम काँग्रेस पक्षाच्या वतीने सुरू आहे.
राहुल गांधीच्या बाबतीमध्ये भाजपने सुडाचे राजकारण केले आहे. एकीकडे प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू व भाजपचे एक आमदार यांना दोन वर्षाची शिक्षा झाली तरी त्यांची आमदारकी रद्द केली नाही हा कुठला न्याय ?भाजपकडे गेलेला व्यक्ती वॉशिंग मशीन मध्ये टाकला जातो व स्वच्छ होतो हे सर्व जनता जाणून आहेत. येणाऱ्या 2024 च्या निवडणुकीत महाविकास आघाडी पक्षाला जनता पाठीशी राहील असे त्यांनी सुतोवाचक केले व काँग्रेस पक्षाचे कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी करीत असल्याचे सांगितले पत्रकार संजय पाटील यांनी प्रश्न विचारला असता महाराष्ट्रात जुनी पेंशनसाठी कर्मचारी आंदोलन करीत होते तेव्हा महाविकास आघाडी सरकारने कोणत्याही प्रकारचा कर्मचाऱ्यांना सपोर्ट मिळाला नाही. व विरोधी पक्ष म्हणून प्रश्न आक्रमकपणे मांडता आला नाही. त्यावर मा.अध्यक्ष अँड पाटील म्हणाले की
तीन राज्यांमध्ये काँग्रेसने जुनी पेन्शन योजना दिली पुढे महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर जुनी पेन्शन हा प्रश्न मार्गी लावेल असे त्यांनी सांगितले.
यावेळी संदीप भैय्या पाटील ,माजी काँग्रेस अध्यक्ष, अजबराव पाटील उपाध्यक्ष काँग्रेस सेवादल महाराष्ट्र, संदीप घोरपडे सरचिटणीस जिल्हा काँग्रेस, सुलोचना वाघ महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष, डी.डी.पाटील ओबीसी सेल जिल्हाअध्यक्ष, गोकुळ पाटील काँग्रेस तालुका अध्यक्ष ,बन्सीलाल भागवत अध्यक्ष काँग्रेस सेवादल अमळनेर, संभाजी पाटील सदस्य कृषी उत्पन्न बाजार समिती, शाम पवार माजी अध्यक्ष शेतकी संघ, राजू फाफोरेकर, नगरसेवक जयवंतराव पाटील मराठा समाज अध्यक्ष, महेश पाटील युवक काँग्रस अध्यक्ष अमळनेर के.डी .पाटील माजी जी. प.सदस्य धुळे बी.के. सूर्यवंशी रेशनींग अध्यक्ष प्रताप पाटील सरपंच अंबारे रोहिदास पाटील रामकृष्ण पाटील उपस्थित होते.
पत्रकार परिषदेचे प्रस्ताविक व आभार संदीप घोरपडे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *