1 min read

रायगड जिल्हा परिषद – आलिबाग कार्यालयात प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सरांची भेट

Loading

रायगड जिल्हा परिषद – आलिबाग कार्यालयात प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सरांची भेट

ठाणे ( मनिलाल शिंपी ):रायगड जिल्ह्यातील गेली अनेक वर्षे शिक्षकांची व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची अनेक कामे बऱ्याच दिवसापासून प्रलंबित होती , ती पूर्ण व्हावीत म्हणून कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सौ. ज्योती शिंदे मॅडम, शिक्षणाधिकारी (प्राथ) सौ. गुरव मॅडम यांच्याबरोबर चर्चा केली व तातडीने कामे सोडवण्यास सांगितले त्यामध्ये वैयक्तिक मान्यता, शालार्थ आयडी, वेतन वाढ, वरिष्ठ वेतनश्रेणी, संच मान्यता, ज्यु कॉलेज च्या तुकडी वाढ, विनाअनुदानित वरून अनुदानित, वैद्यकीय बिल, अनुकंपा तत्त्वावर भरती, ग्रंथपाल अशी अनेक कामे गेली अनेक वर्षे प्रलंबीत होती. रायगड जिल्हातील सर्वांना बोलावून त्यांचे प्रेश्न समजून घेतले, आज जवळपास 250 शिक्षकांने आप आपल्या समस्या मांडल्या त्यानंतर आमदार म्हात्रे सरांनी संबंधित शिक्षणाधिकारी व त्यांच्या कार्यालयातील आधिकारी आणि कर्मचारी यांच्या समवेत मिटिंग करून वरील प्रलंबीत प्रेश्न लवकरात लवकर निकाली काढण्याच्या सूचना केल्या, माझ्या मतदार संघातील कोणताही शिक्षक, शिक्षेकेतर बंधू बघिनी त्यांच्या न्याय हक्का पासून वंचित राहणार नाही तुमच्या सर्वांच्या समस्या सोडविण्यासाठी तुमचा हक्काचा माणूस कटीबद्ध आहे तुम्ही सर्वांनी काळजी आणि चिंता करायची नाही अशी भावना व्यक्त केली. काही कामे लगेच तात्काळ सोडवली व त्याचे आदेश सुद्धा आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे म्हात्रे सर यांच्या हस्ते वितरित केले*

*याप्रसंगी आमदार म्हात्रे सरांचे अनेक कार्यकर्ते, शिक्षक, महिला शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थीत होते.
अशी माहिती रविंद्र पाटील
जिल्हाध्यक्ष रायगड यांच्याकडून देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *