1 min read

पारिवारिक संमेलनातुन संयुक्त कुटुंब व्यवस्था दिसून येते : जयसिंग वाघ

Loading

पारिवारिक संमेलनातुन संयुक्त कुटुंब व्यवस्था दिसून येते : जयसिंग वाघ

यावल :- वेगवेगळ्या परिवाराचे संमेलन दरवर्षी भरविन्याची संकल्पना अलिकड दृढ़मूल होत असून परिवारातिल विविध सभासद जे विविध भागांमध्ये राहतात ते सर्व एकत्र येतात , आपल्या विविध कलागुणांचे सादरीकरण करतात व पारिवारिक एकोपा वृद्धिंगत करतात, यातून संयुक्त कुटुंब व्यवस्था आजही आधुनिक स्वरुपात अस्तित्वात असल्याचे दिसून येते , ही पारिवारिक व्यवस्था अशीच टिकून राहण्या करीता सर्वानि प्रयत्नशील रहावे असे आवाहन प्रसिद्ध साहित्तीक जयसिंग वाघ यांनी केले.
यावल तालुक्यातील वढोदे या गावी २६ मार्च पासून अहिरे परिवार स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले असता त्याचे उदघाटन जयसिंग वाघ यांचे हस्ते करण्यात आले असता ते बोलत होते .
वाघ यांनी आपल्या भाषणात सांगितले की , डॉ बाबासाहेब आम्बेडकर यांच्या काळात बाबासाहेबांची चळवळ या गावी मुरलीधर अहिरे यांनी रुजविली , ते तरुणपनापासून विद्रोही व निरीश्वरवादी होते , त्यांनी बाबासाहेबांना प्रत्यक्ष बघितले असून बाबासाहेबांचे अंतिम दर्शन दादर येथे जाऊन घेतले आहे .या अहिरे परिवाराचा हा ऐतिहासिक वारसा नक्कीच प्रेरणा देत राहिल .
आजच्या तारुणांनी आपल्या बुद्धिचा , कार्याचा उपयोग सामाजिक सुधारणा करण्या करीता करुन नवा आदर्श परिवार व समाज घड़वावा असेही आवाहन वाघ यांनी केले , या प्रसंगी अहिरे परिवारातिल ५० व्यक्तिनचा सत्कार करण्यात आला , विविध स्पर्धा घेण्यात आल्या , विविध सभासदानी विविध कला सादर केल्या .
या कार्यक्रमाचे आयोजन अशोक अहिरे , नथु अहिरे , सुनील अहिरे , वासुदेव अहिरे , आनंद अहिरे , प्रवीण अहिरे यांनी केले होते , या प्रसंगी शांताबाई , मथुराबाई , चमेलीबाई , सरुबाई , नबाबाई , मनकरनाबाई , मीराबाई या जेष्ठ महिलांचा यथोचित सन्मान करण्यात आला .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंकज तायड़े , प्रास्ताविक अशोक अहिरे तर आभार भारती अहिरे यांनी केले , महाराष्ट्रभरातून दोनशे पेक्षा अधिक सभासद यात सहभागी झाले होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *