1 min read

राजेंद्र भोईर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून
गरीब गरजूंना धान्याचे वाटप!

Loading

राजेंद्र भोईर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून
गरीब गरजूंना धान्याचे वाटप!

ठाणे,भिवंडी दि.२७(मनिलाल शिंपी) भिवंडी तालुक्यातील राहणाळ गावातील माजी सरपंच, भाजपा ठाणे जिल्हा उपाध्यक्ष, तथा रोटरी क्लब भिवंडी रुरलचे माजी अध्यक्ष श्री राजेंद्र गोपीनाथ भोईर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ भिवंडी रुरल च्या वतीने राहणाळ येथील झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या गरीब गरजू कुटुंबीयांना धान्याचे वाटप करण्यात आले, या कार्यक्रमाचे आयोजन भिवंडी रुरल च्या वतीने करण्यात आले होते ,
सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री.प्रेमनाथ नाईक (प्रेसीडेंट-रोटरी क्लब ऑफ भिवंडी) भाजपा तालुकाध्यक्ष तथा रोटेरियन प्रकाश काशिनाथ म्हात्रे,प्रभाकर पाटील,प्रमोद म्हात्रे, सन्माननीय सभासद कृष्णा गायखे,संदिप म्हात्रे ,प्रताप पाटील,नितीन पाटील ,राकेश गायकवाड व आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *