जुन्या पेन्शनच्या मागणीवर महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ (फेडरेशन) ठाम
![]()

जुन्या पेन्शनच्या मागणीवर महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ (फेडरेशन) ठाम
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
जुनी पेंशन च्या मागणीवर महाराष्ट्र माध्य. शिक्षक संघ (फेडरेशन) ठाम..
राज्य शासकीय, निमशासकीय कर्मचारी व शिक्षक संघटना समन्वय समिती च्या नेतृत्वाखाली ‘जुनी पेंशन योजना लागू करणे या प्रमुख मागणीसह अन्य महत्वपूर्ण मागण्यांच्या पूर्ततेसाठी दि. १४ मार्च २०२३ पासून सुरू झालेले ‘न भूतो न भविष्यति । असे प्रखर आंदोलन
समन्वय समितीच्या वतीने संस्थगित करण्याचा निर्णय दि. २० मार्च २०२३ रोजी घेण्यात आला. त्यामुळे
महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघा (फेडरेशन) ला संघटनात्मक शिस्तपालनासाठी अनिच्छेने समन्वय
समितीचा संप माघारीचा निर्णय मान्य करावा लागला
तथापि दि. १ नोव्हेंबर २००५ पुर्वी व नंतरच्या कर्मचाऱ्यांना पूर्वलक्षी प्रभावाने राज्यातील सर्व शिक्षक कर्मचा-यांना १९८२ ची जुनी पेंशन योजना लागू करण्यात यावी या मागणीशी महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक
संघ (फेडरेशन) ठाम आहे. या विषयावर शासनाने नियुक्त केलेली समितीने १९८२ च्या जुन्या पेंशन
योजनेचे मूळ स्वरूप व तरतूदी कायम ठेवून शिफारस कराव्यात असे अपेक्षित आहे.महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ (फेडरेशन) या पुढील काळात जुनी पेंशन लागू करण्याची
मागणी पूर्ण होईपर्यंत नित्याप्रमाणे संघर्षमय आंदोलन व समर्पित विचाराने कटिबद्ध आहे व
असेल महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघ (फेडरेशनचे) अध्यक्ष दादासाहेब ज्ञानेश्वर कानडे व सेक्रेटरी दादासाहेब शालिग्राम भिरूड यांनी प्रसिद्ध पत्रकार केले आहे.

