1 min read

मानवसेवा हीच ईश्वरसेवा ग्रुपचा नाविन्यपूर्ण उपक्रम. गुढीपाडव्याच्या निमित्ताने वीट भट्टी कामगार आणि आदिवासी वस्तीत ,आमरस, पुरणपोळी, पूरी भाजी वाटप!

Loading

मानवसेवा हीच ईश्वरसेवा ग्रुपचा नाविन्यपूर्ण उपक्रम. गुढीपाडव्याच्या निमित्ताने वीट भट्टी कामगार आणि आदिवासी वस्तीत ,आमरस, पुरणपोळी, पूरी भाजी वाटप!

ठाणे कल्याण दि.२२( प्रतिनिधी)
गुढीपाडव्याच्या निमित्ताने भिवंडी, कल्याण, डोंबिवली,कल्याण पश्चिम आदिवासीं वस्ती, वीट भट्टी कामगारांना मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा या ग्रुपच्या वतीने स्नेहभोजन,आमरस,व पुरणपोळी चे. मानवसेवा हीच ईश्वरसेवा या ग्रुपचे प्रमुख डॉ मनिलाल रतिलाल शिंपी यांच्या संकल्पनेनुसार स्वामीनारायण मंदिर हॉलचे संचालक डॉ. दिनेश भाई ठक्कर, दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ. किशोर बळीराम पाटील, रोटी डे ग्रुपचे डॉ.नितील चंदैया, डॉ.तरुण नागडा ,ज्येष्ठ समाजसेवक डॉ.रामचंद्र देसले , यांच्या सहकार्याने, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो अपुले, तोची साधू ओळखावा,देव तेथेची जाणावा. . .. या उक्तीप्रमाणे
भारतीय नवर्षाचे स्वागत ,गुढी पाडवा, सणानिमित्त झोपडीत, उन्हातान्हात कष्ट करून पोटाची खळगी भरण्यासाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या आदिवासी पाडा, वीटभट्टी कामगार यांना आमरस, पुरण पोळी, पुलाव भात, पूरी भाजी, आणि फळ वाटप करून गुढीपाडवा सण साजरा करण्यात आला. मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा व्रत घेतलेले राजस्थान नामदेव समाजाचे सेक्रेटरी नटवर वर्मा, विश्व इंजिनिअरिंगचे संचालक किशोर अढळकर, लेडीज एक्सप्रेसच्या मधुबेन ठक्कर, विभा जैन,ज्योती पुजारा, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव यशवंत अनंत म्हात्रे, रोटी डे ग्रुपचे प्रमुख डॉ.तरुण नागडा, डॉ. नितिल चंदेईया, लक्ष्मण शेठ तरे ,मुकेश पुजारा, श्रीमती अरुणा मॅडम,पोलीस पाटील संघाचे अध्यक्ष सोमनाथ ठाकरे यांनी विशेष परिश्रम घेतले.तसेच डॉ.स्वप्नील विसपुते,श्रीमती नीता सुराईकर,श्रीमती दीपिका तिवारी,यांनी पुरिभाजी चे नियोजन केले होते. गुढीपाडवा सण साजरा करण्यासाठी सर्व समाजसेवक यांचे या कार्यक्रमाला विशेष परिश्रम घेतले. मानवसेवा हीच ईश्वरसेवा ग्रुप तर्फे सर्वांना भारतीय नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या,आणि सर्व दानशूरदात्यांचे मानव सेवा हीच खरी ईश्वरसेवा या ग्रुपच्या वतीने दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ किशोर बळीराम पाटील यांनी आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *