साने गुरुजी विद्यामंदिर शाळेतील दीक्षा पाटील शालेय स्पर्धा परीक्षेत ही राज्यातून सर्वप्रथम…
![]()


भारती विद्यापीठ , पुणे संचलित, शालेय स्पर्धा परीक्षा (जनरल नॉलेज) डिसेंबर-2022, या परीक्षेत आमच्या साने गुरुजी विद्यामंदिर अमळनेर , शाळेतील विद्यार्थिनी दीक्षा ज्ञानेश्वर पाटील इयत्ता 7 वी.. ही राज्यातून सर्वप्रथम आली. हीस 172/200 गुण प्राप्त झाले , A ग्रेड मिळवला. या परीक्षेत एकूण 193 विद्यार्थी शाळेतून प्रविष्ट होते . कु.दीक्षा हिचे आमच्या शाळेचे संस्थापक माननीय श्री बापूसो गुलाबराव पाटील, अध्यक्ष श्री हेमकांत पाटील, सचिव श्री संदीप घोरपडे सर तसेच सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक श्री संजीव पाटील सर, शिक्षक वृंद यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे. या विद्यार्थिनीला श्री किशोर अहिरराव सर व श्री सचिन पाटील सर यांचे मार्गदर्शन लाभले . कु दीक्षा हिचा 10 मे 2023 रोजी पुणे येथे भारती विद्यापीठ, धनकवडी ..येथे सत्कार होणार आहे.

