मानवसेवा हीच ईश्वरसेवा ग्रुप ची खरी सामाजिक बांधिलकी गुढीपाडव्याच्या निमित्ताने 1000 वीटभट्टी कामगारांना स्नेहभोजन,आमरस, व पुरणपोळी स्नेहभोजन वाटप !
![]()

मानवसेवा हीच ईश्वरसेवा ग्रुप ची खरी सामाजिक बांधिलकी गुढीपाडव्याच्या निमित्ताने 1000 वीटभट्टी कामगारांना स्नेहभोजन,आमरस, व पुरणपोळी स्नेहभोजन वाटप !
ठाणे दि.२१( मनिलाल शिंपी)
जे का रंजले गांजले,त्यासी म्हणे जो आपुले!
तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा!!
या उक्ती प्रमाणे
गुढीपाडव्याच्या निमित्ताने भिवंडी, कल्याण, डोंबिवली येथील वीट भट्टी कामगारांना मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा या ग्रुपच्या वतीने स्नेहभोजन,आमरस,व पुरणपोळी चे वाटप करण्यात येणार आहे. मानवसेवा हीच ईश्वरसेवा या ग्रुपचे प्रमुख डॉ. मनिलाल रतिलाल शिंपी यांच्या संकल्पनेनुसार स्वामीनारायण मंदिर हॉलचे संचालक डॉ. दिनेश भाई ठक्कर, दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ. किशोर बळीराम पाटील, रोटी डे ग्रुपचे डॉ.नितील चंदैया, डॉ.तरुण नागडा ,ज्येष्ठ समाजसेवक डॉ.रामचंद्र देसले , यांच्या सहकार्याने, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो अपुले, तोची साधू ओळखावा,देव तेथेची जाणावा. . .. या उक्तीप्रमाणे
भारतीय नवर्षाचे स्वागत ,गुढी पाडवा, सणानिमित्त झोपडीत, उन्हातान्हात कष्ट करून पोटाची खळगी भरण्यासाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या गरीब गरजू बंधू भगिनींना, पुलाव भात,आमरस व पुरणपोळीचा घास वाढून आदिवासी पाडा, वीटभट्टी कामगार यांच्या सोबत बुधवार दिनांक २२/०३/२०२३ रोजी, गुढीपाडवा सण साजरा करण्यात येणार आहे. मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा व्रत घेतलेले राजस्थान नामदेव समाजाचे सेक्रेटरी नटवर वर्मा, विश्व इंजिनिअरिंगचे संचालक किशोर अढळकर, लेडीज एक्सप्रेसच्या मधुबेन ठक्कर, विभा जैन,ज्योती पुजारा, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव यशवंत अनंत म्हात्रे, लक्ष्मणशेठ तरे,स्वच्छ भारत अभियान चे मृतुंजय शुक्ला आणि सर्व समाजसेवक यांचे या कार्यक्रमाला विशेष सहकार्य लाभले आहे. त्यामुळे सर्व दानशूरदात्यांचे मानव सेवा हीच खरी ईश्वरसेवा या ग्रुपच्या वतीने आभार मानण्यात आले आहेत.

