महाराष्ट्रात 40 आमदार सत्ता बदलू शकतात तर पेन्शन पीडित बंधू काय नाही करू शकत, महिलांचा आपल्या मनोगततून व्यक्त केल्या भावना
अमळनेरला उपविभागीय कार्यालया समोर पेन्शनच्या चौथ्या दिवशी पेन्शन पीडित बांधवांनी विविध गाणे सादर करून परिसर दणदणला..
![]()

महाराष्ट्रात 40 आमदार सत्ता बदलू शकतात तर पेन्शन पीडित बंधू काय नाही करू शकत, महिलांचा आपल्या मनोगततून व्यक्त केल्या भावना
अमळनेरला उपविभागीय कार्यालया समोर पेन्शनच्या चौथ्या दिवशी पेन्शन पीडित बांधवांनी विविध गाणे सादर करून परिसर दणदणला..
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
अमळनेर उपविभागीय कार्यालय समोर जुनी पेन्शनच्या बेमुदत संपाचा आज चौथ्या दिवशी अनेक पेन्शन पीडित बंधू भगिनींनी विविध गाणे सादर करून आजूबाजूच्या परिसरात दणकावून टाकला…
चाळीस आमदार महाराष्ट्रात सत्ता बदलू शकतात तर पेन्शन पिढीत बंधू काय नाही करू शकतात? असे बेमुदत संपामध्ये अनेक महिलांनी आपल्या भावना मनोगतातून व्यक्त केल्या.
यावेळी पत्रकार अजय भामरे, योगेश कापडणे,वर्षा पाटील, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख गोकूळ पाटील, सुधीर चौधरी, पूनम पाटील, प्रेरणा पाटील,ललिता माळी,छगन पाटील,भगिनी मंडळाच्या मुख्याध्यापिका मंगला सोनवणे,
खान्देश शिक्षण मंडळाचे विश्वस्त वसुंधराताई लांडगे, काँग्रेसचे नेते प्रा. सुभाष पाटील
यांनी मनोगत व पेन्शन संदर्भात काही बांधव भगिनींनीं कविता सादर केल्या. उद्धव ठाकरे गटाच्या नाशिक विभाग महिला प्रमुख व महाराष्ट्र टीचर असोसिएशनच्या राज्याध्यक्षा शुभांगी ताई पाटील यांनी भ्रमणध्वनीद्वारे जुनी पेन्शन बेमुदत संपला पाठिंबा देत आपले मनोगत व्यक्त केले.
जुनी पेन्शन संघटनचे नाशिक विभागाचे अध्यक्ष डॉ कुणाल पवार,टिडीएफचे कार्याध्यक्ष संदीप घोरपडे यांनी पेन्शन बेमुदत संपाच्या उदयाच्या नियोजनाबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे,मुख्याध्यापक संघाचे मा.अध्यक्ष एम.ए पाटील,धिरज पाटील, वसुंधरा दशरथ लांडगे,अमित पाटील, रोहीत तेले, विलास बिहा-डे,मनोहर पाटील, स्वप्नील पाटील,प्रविण पाटील,
ईश्वर महाजन,आर.जे.पाटील, उमेश काटे, राजू फापोरेकर ,बाजार समितीचे संचालक संभाजी पाटील सह अनेक पेन्शन पीडित बंधू भगिनी विविध संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








