1 min read

अमळनेरला जुनी पेन्शनच्या मागणीसाठी भव्य दिव्य रॅलीचे आयोजन

Loading

पेंशन मोर्चा.. पेंशन मोर्चा.. पेंशन मोर्चा..

अमळनेर तालुक्यातील सर्व विभागाचे कर्मचारी, कर्मचारी संघटनाचे सदस्य, पदाधिकारी यांना नम्रतापूर्वक विनंती तथा जाहीर आवाहन करण्यात येत आहे की *उद्या दि. 18/03/2023 रोजी सकाळी ठीक 10:00 वाजता पेंशन मार्च* म्हणजेच मोर्चाचे नियोजन करण्यात आले आहे. तरी अमळनेर तालुका सरकार निमसरकारी कर्मचारी समन्वय समितीमार्फत तालुक्यातील सर्व जेष्ठ श्रेष्ठ कर्मचारी बंधु तथा NPS धारक बंधूंना विंनती आहे की आपल्या न्याय हक्कासाठी *पेंशन मोर्च्यात* सक्रिय सहभागी व्हावे. आपल्या लहान भावांच्या न्याय मागणीसाठी कृपया एक दिवस नक्की वेळ काढून सहभागी व्हा. आपली साथ हीच आमच्या लढण्याची प्रेरणा व ऊर्जा आहे. सर्व पेन्शन पात्र बांधवांनीही उद्याच्या रँलीमध्ये आवर्जून उपस्थित रहावे असे वरिष्ठ पातळीवरून संघटनेच्या पदाधिकारी यांनी आव्हान केले आहे

स्थळ:- छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह ते तहसील कार्यालय, अमळनेर
वेळ व वार:- शनिवार, सकाळी ठीक 10 वा.

विनीत,
राज्य सरकारी निमसरकारी, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती ता. अमळनेर जि.जळगाव.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *