शासनाच्या अध्यादेशची होळी करत जुनी पेन्शन समन्वय समिती व नगरपालिका कर्मचाऱ्यांचे तिसऱ्या दिवशी केले आंदोलन….
पेंशनच्या बेमुदत संपाच्या तिसऱ्या दिवशी कर्मचाऱ्यांचा मोठा सहभाग
![]()

शासनाच्या अध्यादेशची होळी करत जुनी पेन्शन समन्वय समिती व नगरपालिका कर्मचाऱ्यांचे तिसऱ्या दिवशी केले आंदोलन….
पेंशनच्या बेमुदत संपाच्या तिसऱ्या दिवशी कर्मचाऱ्यांचा मोठा सहभाग
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- 14 मार्चपासून अमळनेरला महसूल कार्यालयासमोर जुनी पेन्शन समिती यांचा बेमुदत आंदोलन सुरू आहे आज तिसऱ्या दिवशी नगरपालिकेचे कर्मचारी व संघटनेचे सर्व पदाधिकारी रॅली काढत महसूल कार्यालयासमोर व जुनी पेन्शन समिती व पेंशन पिडीत कर्मचारी यांच्या समवेत शासनाच्या अध्यादेशाची होळी करण्यात आली. पेन्शनच्या संदर्भात मोठमोठ्या घोषणा देण्यात आल्या…
यावेळी पेन्शन समन्वय समितीने अमळनेर तालुक्यातील सर्व शाळा 100% बंद करण्यासाठी आवाहन करत संपामध्ये सक्रिय सहभाग नोंदवा असे आवाहन करण्यात आले. अमळनेर तालुक्यात शहरातील काही भागातील शाळा सुरू असल्यामुळे पेन्शन समन्वय समितीने गांधीगिरी करत फूल देऊन त्यांचा सन्मान केला. व ग्रामीण भागातही अजून काही शाळा सुरू आहेत त्या बंद करण्यासाठी व संपामध्ये त्यांना सामील करण्यासाठी आवाहन करण्यात आले.
यावेळी जुनी पेन्शन समन्वय समितीचे नाशिक कार्याध्यक्ष डॉ कुणाल पवार,
टीडीएफ संघटनेचे संदीप घोरपडे, सामाजिक कार्यकर्ते रणजीत शिंदे, नगरपालिकेचे कर्मचारी संघटनेचे सोमचंद संदानशिव,अनिल बेडेंवाल, माध्यमिक शिक्षक संघाचे संजय पाटील, शिक्षक भरतीचे आर जे पाटील, जुनी पेंशन संघटनेचे सुशील भदाने,प्रमिला मोरे,सविता आहिरे
अमित पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करत शासनाच्या दुटप्पी धोरणाबाबत टीका करत कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या पेन्शनवर शासन समिती नेमते व राजकीय लोकांचे पेन्शन वाढवण्यासाठी एका सेकंदात अध्यादेश निघतो … राज्यात समानतेचे तत्त्व आहे का?? आपण “समान काम समान वेतन” म्हणतो, शासन सर्व क्षेत्रात खाजगीकरण करू पाहत आहे. शासनाचे हे डाव सगळ्या कर्मचाऱ्यांनी हाणून पाडले पाहिजे. सगळ्या संघटनेतील पदाधिकारी,कर्मचारी व सर्व पेन्शन पीडित बांधवांनी एकत्र येऊन शासनाला आपली ताकद दाखवून द्यावी असेही सांगितले.
जुनी पेन्शनचा लढा तीव्र करण्यासाठी लढा निधी उभारत समन्वय समितीची स्थापना करण्यात आली. 18 तारखेला अमळनेर शहरांमध्ये भव्य दिव्य पेन्शन पिडीत बांधवांची रॅली काढली जाणार आहे .तरी अमळनेर तालुक्यातील पेन्शन पीडित बांधव ,पेन्शन पात्र कर्मचाऱ्यांनी, विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ज्यांनी टेन्शनच्या बेमुदत संपला पाठिंबा दिलाय अशा पक्षाचे नेते कार्यकर्ते उपस्थित राहून संप यशस्वी करावा असे आवाहन नाशिक विभागाचे कार्याध्यक्ष डॉ कुणाल पवार,टिडिएफचे राज्य समन्वयक संदीप घोरपडे यांनी केले आहे.
यावेळी माध्यमिक शिक्षक पतपेढीच्या संचालक तुषार बोरसे ,प्रा अशोक पवार, मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, समता शिक्षक परिषदेचे तालुका अध्यक्ष बापूराव पाटील, मुख्याध्यापक संघाचे माजी तालुकाध्यक्ष एम.ए पाटील, पंचायत समितीचे भटू बाविस्कर, ग .स .चे संचालक वाल्मिक मराठे, साने गुरुजी पतपेढीचे अध्यक्ष सचिन साळुंखे, ओबीसी शिक्षक संघटनेचे ईश्वर महाजन,राहूल पाटील, अजय भामरे,प्रहार संघटनेचे सुधीर चौधरी, शिक्षक सेनेचे बोरसे सर, नगरपालिका संघटनेचे अविनाश संदानशिव
राजू चंदाले,पप्पू कालसे,ज्ञानेश्वर संदानशिव,किशोर संगेले
सह अनेक पेन्शन पीडित व विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
संप अधिक तिव्र करण्याबाबत तालुका समन्वय समिती गठीत 15 मार्च 2023 रोजी तालुक्यातील सर्व कर्मचारी संघटनांची बैठक तहसील कार्यालय याठिकाणी पार पडली यावेळी तालुक्यातील लढ्याला आणखी ताकदीने बळ देण्यासाठी समन्वय समितीची पुनर्स्थापना करण्यात आली. यात जवळपास तालुक्यातील 37संघटना पदाधिकारी सहभागी झाले आहेत. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष मा.श्री. बाळासाहेब पवार यांच्यासह, महिला जिल्हाध्यक्ष श्रीम. सुलोचनाताई वाघ, काँग्रेस शेतकरी सेलचे तालुकाध्यक्ष प्रा. सुभाष पाटील, खा.शि. मंडळाचे संचालक डॉ. अनिल शिंदे, मराठा समाज तालुकाध्यक्ष श्री. जयंतराव पाटील तसेच इतर पदाधिकारी यांनी देखील भेट व लढ्याला पाठिंबा दिला. यावेळी तालुकास्तरीय समन्वय समिती मार्फत रोजच्या लढ्याचे नियोजन व दिशा ठरवण्याचे काम करण्यात येईल. यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी हजर होते. या समितीत खालील संघटना पदाधिकारी यांची एकमताने समन्वय समितीत निवड करण्यात आली.
1) डॉ. कुणाल पवार (निमंत्रक, तालुका समन्वय समिती तथा विभागीय अध्यक्ष- जुनी पेन्शन संघटना)
2) श्री संदीप घोरपडे (राज्य कोषाध्यक्ष- टी डी एफ)
3) श्री तुषार पाटील (जिल्हा कौन्सिल सदस्य)
4) श्री प्रकाश पाटील (तालुकाध्यक्ष- माध्य मुख्याध्यापक संघ)
5) श्री सुशील भदाणे (तालुकाध्यक्ष- जुनी पेंशन संघटना)
6) श्री आशिष पवार (महा राज्य प्राथ.शिक्षक महासंघ)
7) श्री आर जे पाटील (जिल्हा कार्याध्यक्ष- शिक्षक भारती)
8) श्री बापूराव ठाकरे (महा.राज्य समता शिक्षक परिषद)
9) श्री मकरंद निळे (तालुकाध्यक्ष- महा.टीचर्स असोसिएशन)
10) श्री के .डी. पाटील (उपाध्यक्ष- धनदाई माध्य.विद्यालय)
11) श्री संजय पाटील (कार्याध्यक्ष- क्रीडा समिती)
12) श्री एस. पी वाघ (उपाध्यक्ष- क्रिडा संघटना जळगाव)
13) श्री सुधीर चौधरी (प्रहार दिव्यांग संघटना)
14)श्री किशोर माळी (महा.राज्य हिवताप संघटना)
15) श्री व्ही. एस.बैसाणे (जि. प आरोग्य कर्मचारी संघटना)
16) श्री दिगंबर सैंदाने (ग्रामसेवक संघटना)
17) श्री पुरुषोत्तम पाटील (महसूल संघटना)
18)श्री कैलास पाटील (राष्ट्रवादी शिक्षक संघटना)
19) श्री पी.वाय.पाटील (महा.इले. वर्कर्स फेडरेशन)
20) श्री सोमचंद संदानशिव (न.पा.कर्मचारी संघटना)
21) श्री.वाल्मिक पाटील (सरचिटणीस- प्राथ. जि.शिक्षकसंघ)
22) श्री जितेंद्र ठाकूर (ग्रंथपाल संघटना तालुका अमळनेर)
23)श्री संदीप वाघ (प्राथमिक शिक्षक संघ जि. प.)
24) श्री छगन पाटील (दिव्यांग शिक्षक संघटना)
25) श्री अजय भामरे (समता शिक्षक परिषद)
26) श्री दिलीप प्रतापराव सोनवणे (पदवीधर शिक्षक संघटना)
27) श्री जितेंद्र पवार (लिपिक वर्गीय संघटना)
28)श्री भानुदास पवार (शिक्षक भारती संघटना)
29) श्री राजेंद्र बाबुराव कोळी (कास्ट्राईब संघटना)
30) श्री उमेश काटे(कार्याध्यक्ष, टी. डी. एफ)
31) श्री आनंदराव अहिरे,(तालुकाध्यक्ष- राष्ट्रवादी शिक्षक संघटना)
32) श्री रणजित शिंदे (खा.प्राथ.मुख्याध्यापक संघटना)
33) श्री योगेश नाना पाटील (शिक्षक नेतृत्व)
34) श्रीमती पाकिजा पिंजारी (उपाध्यक्ष जुनी पेंशन संघटना)
35) श्रीमती क्रांती पाटील (अखिल प्राथमिक शिक्षक संघटना)
36) श्रीमती सविता अहिरे (महिला नेतृत्व)
37)ईश्वर रामदास महाजन जिल्हाध्यक्ष ओबीसी शिक्षक असोसिएशन








