1 min read

हर्षदा वाघ उद्योजक पुरस्काराने सन्मानित

Loading

हर्षदा वाघ उद्योजक पुरस्काराने सन्मानित

अमळनेर प्रतिनिधी
मौलाना आझाद अल्पसंख्याक समाज विकास फाऊंडेशन जळगांव यांच्या वतीने अल्पबचत सभागृह जळगांव येथे आज हर्षदा निलेश वाघ यांना विद्युत क्षेत्रात महिला कॉन्ट्रॅक्टर उद्योजक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हर्षदा निलेश वाघ यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल मौलाना आझाद अल्पसंख्यांक समाज विकास फाउंडेशनने घेतली व त्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाला जळगांव नगरपरिषदेच्या महापौर जयश्रीताई महाजन, स्वामी समर्थ शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष आण्णासाहेब मनोज पाटील, मौलाना कलाम आझाद संस्थेचे अध्यक्ष फिरोज शेख सर ,करीम सालार, नोबल इंटरनॅशनल शाळेच्या संचालिका अर्चनाताई सूर्यवंशी व पदाधिकारी उपस्थित होते. त्या पूज्य साने गुरुजी ग्रंथालयाचे सचिव आण्णासाहेब प्रकाश वाघ यांच्या स्नुषा आहेत.
यांच्या पुरस्काराबद्दल पूज्य साने गुरुजी ग्रंथालय मोफत वाचनालयाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष चिटणीस व संचालक मंडळ यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *