ग्लोबल लीडर्सच्या यादीत आदित्य ठाकरे
![]()

ग्लोबल लीडर्सच्या यादीत आदित्य ठाकरे
मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे)
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे आणि भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष मधुकेश्वर देसाई यांच्यासह भारतातील सहा जणांची नावे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने 2023 च्या यंग ग्लोबल लीडर्सच्या यादीत समाविष्ट केली आहेत.
महाराष्ट्रातील राजकारणातील एक अग्रगण्य नाव व ठाकरे कुटुंबातील नेतृत्व याच्या या यशाबद्दल उपशाखाप्रमुख हितेंद्र राठोड यांनी आपल्या युवा नेत्याचे अभिनंदन करून त्याच्या पूढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तर वरीष्ठ क्रीडा शिक्षक विजय अवसरमोल यांनी सर्व तरुण लीडर्सच्या निवडीबद्दल अभिनंदन करून ही नवी तरुण पिढी देशाला नवी वाट व दिशा देतील असा विश्वास व्यक्त केला
या यादीतील अन्य भारतीयांमध्ये टीव्हीएस मोटरचे व्यवस्थापकीय संचालक सुदर्शन वेणू, उद्योगपती आकृत वैश, तन्वी रत्ना यांचा समावेश आहे.
आज देशाला तरुण व तडफदार नेतृत्वाची गरज आहे. वर्ल्ड इकाँनाँमिक्र फोरम 2023 च्या यंग ग्लोबल लीडर्सच्या यादीत समाविष्ट तरुणांनी इतरांना आदर्श असे कर्तृत्व यापुढे ठेवून इतर तरुणांना प्रोत्साहित करावे अशी अपेक्षा ग्रंथपाल आरती शर्मा यांनी व्यक्त केली आहे

