राज्यव्यापी बेमुदत संपात शिक्षक भारती सहभागी
![]()
राज्यव्यापी बेमुदत संपात शिक्षक भारती सहभागी

जळगांव प्रतिनिधी
दि- 11 मार्च 2023 सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी,शिक्षक संघटना समन्वय समितीने 14 मार्च रोजी पुकारलेल्या राज्यव्यापी बेमुदत संपात शिक्षक भारती संघटना सहभागी होणार असल्याची माहिती शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष नारायण वाघ यांनी दिली.
याबाबत 14 फेब्रुवारी 2023 रोजी शिक्षक भारतीय संघटनेच्या राज्य कार्यकारणीच्या बैठकीत जुन्या पेन्शन साठी बेमुदत संप करण्याच्या संदर्भात मंजूर झालेल्या ठरावावर जिल्हा निहाय चर्चा झाली. यावेळी राज्यव्यापी बेमुदत संप करण्याच्या ठरावाला एकमताने मंजुरी दिली. शिक्षक भारतीचे राज्याध्यक्ष अशोक बेलसरे, कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी केलेल्या आव्हानानुसार शिक्षक भरती या संपात सहभागी होणार आहे जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसह शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नयेत.संस्थांना वेतनेतर अनुदान देण्यात यावे.सरकारी कामकाजातील खाजगीकरण व कंत्राटीकरण बंद करावे. सावित्री प्रतिमा स्वास्थ्य कुटुंब योजना सुरू करावी. रात्र शाळा पूर्ववत सुरू कराव्यात. रिक्त पदांची तात्काळ भरती प्रक्रिया सुरू करावी. अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती तात्काळ देण्यात याव्यात. अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन लगतच्या शाळेत करावे. आदी मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे संप संपूर्ण जिल्हाभर यशस्वी करण्यासाठी कार्याध्यक्ष आर जे पाटील,श्रीमती सुनिता पाटील महिला आघाडी, संजय परदेशी जिल्हाध्यक्ष कला अध्यापक आघाडी,कार्यवाह चंद्रकांत देशमुख, उपाध्यक्ष विजय सोनवणे,युवराज पाटील,गोकुळ राजपूत,सहकार्यवाह दगडू पाटील शांताराम महाजन अमोल वाणी संजय वानखेडे स्वप्निल वंजारी तालुका पदाधिकारी विलास पाटील संजय पाटील हेमंत सावकारे शेखर पाटील अजिज खाटीक पंकज पवार संजय साळुंखे व कार्यकर्ते शाळेत संपाची नोटीस देऊन प्रयत्न करत आहेत

