1 min read

52 टक्के ओबीसी संघटित झाला तर नेत्यांना ओबीसी च्या दारात यावे लागेल-खासदार इम्तियाज जलील

Loading

52 टक्के ओबीसी संघटित झाला तर नेत्यांना ओबीसी च्या दारात यावे लागेल…खासदार इम्तियाज जलील *

औरंगाबाद —
सर्वसामान्यांचा व ओबीसींचा आवाज उठवणारालाच संसदेत पाठवा,शिकलेलाच पाठवा. संसदेत अनेक खासदार बोलतच नाहीत .ज्या सुविधा आमदार आणि खासदारांना मिळतात त्या सर्व प्रकारच्या सुविधा मत देणाऱ्या प्रत्येक माणसाला मिळाल्या पाहिजेत असे प्रतिपादन खासदार इम्तियाज जलील यांनी भारतीय पिछडा (ओबीसी) शोषित संघटनने च्या राज्यस्तरीय अधिवेशनाप्रसंगी उद्घाटक म्हणून बोलताना केले.

ते पुढे म्हणाले की ओबीसी देशात 52 टक्के पेक्षा जास्त आहे .त्यांना या देशात मागणी करावी लागत आहे की, आमची मोजणी करा, दुसऱ्याच्या दार ठोठाव लागत आहे कारण ते विखुरलेले आहे .जर ओबीसी बी .पी. एस. एस च्या माध्यमातून संघटित झाला तर नेत्यांना ओबीसीकडे यावे लागेल.मी या जिल्ह्याचा खासदार म्हणून आपण जे मला निवेदन दिले त्यानुसार ओबीसी जनगणनेचा मुद्दा संसदेच्या अधिवेशनत मांडणारच आहे. या देशातील सर्वसामान्य लोकांना चांगल्या दर्जाचे शिक्षण, आरोग्यविषयक सुविधा मिळाल्या पाहिजेत .डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला संविधान निर्मात्याच नाव दिले आहे.पण हे विद्यापीठ जगातल्या शंभर टॉप विद्यापीठात यायला हवे .पण सध्याचे विद्यापीठाच्या राजकारणावरुन तसे दिसत नाही. याअनुषंगाने चिंता व्यक्त केली. वाढती वृध्दाश्रमाची खंतही त्यांनी व्यक्त केली.

शेवटी पुढे ते म्हणाले कि पुणे या शब्दाचा काय अर्थ निघतो काहीच नाही पण पुण्यामध्ये म. फुले व सावित्रीमाई फुलेंने जे कार्य केल आहे ते पाहता पुणेचे फुले नगर केल पाहिजे. तसा ठराव तुम्ही घेतला पाहिजे. म्हणजे पुणे येथील विद्यार्थी -विद्यार्थीनींनी जेव्हा देश विदेशात जातील तेव्हा म फुलेंचे कार्य जगाला कळेल.

पुढे ते म्हणाले कि महापुरुषोंने लडना सिखाया,खडे रहना सिखाया और सच को सच बोलना सिखाया.

याप्रसंगी कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष डॉ. उज्वलाताई दहिफळे बीपीएसएसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ज्ञानेश्वर गोरे प्रा. सुदाम चिंचाणे बी. पी. एस. एस चे कार्याध्यक्ष गणपती मंडळ , महासचिव आर. के .पाल आदींची भाषणे झाली.

डॉ ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर गोरे आपल्या भाषणात म्हणाले की ओबीसींनी आपल्या हक्क अधिकारासाठी व सामाजिक न्यायासाठी रस्त्यावरची लढाई लढावीच लागेल .ओबीसींची जातनिहाय जनगणना बिहारप्रमाणे महाराष्ट्राने करावी. कारण जनावराची ,पशु ,पक्षाची ,घुबडांची गणना केली जाते .माणसाची का केली जात नाही. म्हणून ओबीसींना जागृत करावे लागेल.

याप्रसंगी कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष डॉ. उज्वलाताई दहिफळे म्हणाल्या कि, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानंतरही ओबीसी, भटके विमुक्त जाति जमातींना आजही मूलभूत सुविधा मिळत नाही. त्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.

प्रा सुदाम चिंचाणे यांनी ओबीसी राज्य अधिवेशन हे सत्यशोधक समाज शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त होत असून राज्य सरकारने खरे तर हे सुवर्ण महोत्सवी वर्ष सरकारी स्तरावरून साजरे करायला हवे होते .पण ही जात वर्ग स्त्रीदास्य समर्थक व्यवस्था आपलाच अजेंडा राबवत आहे. या देशातल्या बहुजन समाजाच्या समतेसाठी संघटितपणे आवाज उठवणारा देशातील एकमेव महात्मा म्हणजेच ज्योतिराव फुले आहेत .ज्यांची काहीच मागणी नसते त्या मागण्या सरकार मंजूर करते .ज्योतिराव फुले यांना भारतरत्न भारत रत्न देण्याची मागणी असताना आजतागायत टाळाटाळ केली जात आहे .ओबीसींना त्यांचा न्याय वाटा दिला जात नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने समाजाची समताधिष्ठित उभारणी होऊ शकणार नाही.

अध्यक्षीय समारोप प्रसंगी एस जी माचनवार म्हणाले कि, देश हुकूमशाही कडे वाटचाल करीत आहे. म्हणून लोकशाही वाचवण्यासाठी सर्वांनी पुढे येणे आवश्यक आहे. जनगणनेसाठी सरकारवर दबाव आणावा लागेल .फुले -शाहू -आंबेडकरांचा महाराष्ट्र प्रगत महाराष्ट्र असूनही जातनिहाय जनगणना होत नाही .पण बिहार सारख्या अप्रगत राज्यात होते. ओबीसी जनगणनेसाठी संघटितपणे लढाऊ उभारण्याचे आवाहन राष्ट्रीय अध्यक्ष एस.जी माचनवार यांनी अध्यक्षीय समारोपात बोलताना केले.

या प्रसंगी संयोजक डॉ कालिदास भांगे ,डॉ प्रभाकर गायकवाड देवराज दराडे, अशोक तारो,डॉ हनुमान वांकर,बालाजी मुडे,जनार्दन कापुरे, विश्वनाथ कोक्कर, शरद बोरसे,डॉ,कृष्ण मालकर,सविता हजारे, सुनीता काळे, मायाताई गोरे,वैशाली पेरके,बळी चव्हाण, अंकुश राठोड,रामकिशन मुंडे, गौरव पाटील, गणेश भुजबळ, आकाश मेहत्रे, यासह अनेक राज्यभरातून अनेक पदाधिकारी उपस्थित होते. उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन डॉ .वसंत हारकळ यांनी केले तर आभार प्रा. रमाकांत तिडके यांनी मांडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *