आंतर महाविद्यालयीन एक दिवसीय छात्र संगोष्टी स्पर्धेत मानसी बिरारी ला द्वितीय पुरस्कार
![]()


आंतर महाविद्यालयीन एक दिवसीय छात्र संगोष्टी स्पर्धेत मानसी बिरारी ला द्वितीय पुरस्कार.
चोपडा(प्रतिनिधी): महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला,विज्ञान, व वाणिज्य महाविद्यालय चोपडा येथे,एकदिवसीय छात्र सगोष्टी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत महाविद्यालयातील विद्यार्थी छात्र यांनी उत्साहाने सहभाग घेतला, या स्पर्धेत प्रथम वर्ष विज्ञान शाखेतील (पदवी) छात्रा कुमारी मानसी निलेश बिरारी हिने द्वितीय क्रमांक मिळवला ,तिला महाविद्यालयाचे प्राचार्य ,प्राध्यापक यांचा हस्ते सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.तिच्या या यशाबद्दल महाविद्यालयातील प्राध्यापक,विद्यार्थी, आणि मित्रपरिवाराकडून अभिनंदन आणि कौतुक करण्यात येत आहे.तसेच बिरारी परिवाराचे देखील अभिनंदन करण्यात येत आहे.कुमारी मानसी हिस संपूर्ण परिसरातून भावी आयुष्यातील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्या देण्यात येत आहेत. 🙏🏽

