मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा या ग्रुपने घेतली अण्णा हजारे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट!
![]()


मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा या ग्रुपने घेतली अण्णा हजारे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट!
ठाणे (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्यातील मानवसेवा हीच खरी ईश्वर सेवा या ग्रुपचे प्रमुख तथा आर एस पी अधिकारी युनिट कमांडर डॉ.श्री.मनिलाल रतिलाल शिंपी ,दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक तथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कोकण विभागीय सचिव डॉ.श्री.किशोर बळीराम पाटील. डोंबिवली रोटरी क्लबचे सचिव श्री. किशोर विश्वनाथ अढळकर,व आंबिवली येथील ॲड.अविनाश सुगंधराव म्हानुनकर यांनी महाराष्ट्र राज्याचे ज्येष्ठ नेते, समाजसेवक ( सुधारक) , भ्रष्ट्राचार निर्मूलन चळवळीचे प्रणेते, आणि माहितीचा अधिकार अधिनियम कायदा समितीचे अध्यक्ष आदरणीय श्री.अण्णा हजारे यांच्या, पारनेर तालुक्यातील राळेगणसिद्धी येथील हनुमान मंदिर निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन, त्यांच्या आरोग्याची चौकशी करून, त्यांना दीर्घायुष्य लाभावे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून त्यांचे सर्व सभासदांनी शुभ आशिर्वाद घेतले व मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा या ग्रुपच्या वतीने आपली प्रेरणा घेऊन सुरू असलेल्या सामाजिक कार्याची माहिती दिली . त्यामुळे त्यांनी मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा या ग्रुपच्या माध्यमातून सपूर्ण महाराष्ट्रात सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात चांगले कार्य करावे अशी आशा अण्णा हजारे यांनी मनिलाल शिंपी यांच्याशी बोलताना व्यक्त केली. आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व आशिर्वाद दीले.

