जागतिक महिला दिनानिमित्त सौ.मनिषा बेडगे यांना कोरोना काळात उत्कृष्ट कार्याबद्दल गौरव
![]()


जागतिक महिला दिनानिमित्त सौ.मनिषा बेडगे यांना कोरोना काळात उत्कृष्ट कार्याबद्दल गौरव करण्यात आला.
जागतिक महिला दिन ८ मार्च २०२३ शासकीय कर्करोग रुग्णालय छत्रपती संभाजीनगर,हेल्थ युनिट पैठण नम्रता महिला ना.स.पतसंस्था, पैठण च्या विद्यमाने महिला दिनानिमित्त आयोजित गरोदर स्त्रियांची, नगरपालिका महिला स्वच्छता कर्मचारी यांचे आरोग्य तपासणी उपचार व कर्करोग जनजागृती शिबीर व कोरोना काळात शासकीय सेवेतील महिला डॉ.,कामगार, कर्मचारी आरोग्य सेविका उत्कृष्ट कार्या केल्याबद्दल त्यांचे सत्कार करण्यात आले.कोरोना काळात कोव्हिड सेंटर, घरोघरी जाऊन चेक- अप करणे लोकांचे सेवा करणे ,कोरोना उत्कृष्ट कार्या केल्याबद्दल आरोग्य सेविका सौ.मनिषा बेडगे यांना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सौ.अनुराधा पाईक यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.गौतम सव्वाशे, प्रपाठक हेल्थ युनिट पैठण, डॉ.भारत चव्हाण, डॉ पंडित किल्लारीकर प्रमुख पाहुणे डॉ.यशोदा किल्लारीकर,सौ.शोभा बर्डे,सौ.अनुराधा पाईक,सौ.अपर्णा हजारे-गोर्डे,सौ.साधना गंगावणे, डॉ रिया पंजवाणी, डॉ.शर्मिष्ठा ढवळे,सौ.मिरा मुंडे,सौ.रजनी जाधव, अशोक पगारे.जागतिक महिला दिनानिमित्त सत्कार केल्याबद्दल मुरलीधर बेडगे,कुलदिप कामशेट्टी, डॉ.सिमा साळवे मॅडम, डॉ.वैशाली पाटील मॅडम यांनी अभिनंदन केले.

